‘वंचित’ने कॉंग्रेसचा घात केला, अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा दणदणीत विजय

‘वंचित’ने कॉंग्रेसचा घात केला, अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा दणदणीत विजय

Akola Lok Sabha : अकोला लोकसभा मतदारसंघात (Akola Lok Sabha Constituency) भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) झालेल्या चुरशीची लढतीत भाजपचे अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. अनुप संजय धोत्रे तब्बल 40 हजार 12 मतांनी विजयी झाले.

दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला; यामिनी जाधवांचा दारुण पराभव! 

अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अनुप धोत्रे, कॉंग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. अखेर अनुप धोत्रे यांनी मोठी आघाडी घेत प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या 28व्या फेरीत अनूप धोत्रे विजयी झाले आहेत. धोत्रे यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करत 40 हजार 12 मतांनी विजय मिळवला.

Uttar Pradesh Loksabha : अयोध्येत भाजपला राम ‘पावला’ नाही, समाजवादीची सायकल ‘सुसाट’… 

अकोला लोकसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या चौदाव्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे अभय पाटील आघाडीवर होते. आता पंधराव्या फेरीत 23798 मते मिळवून भाजपच्या अनुप धोत्रेंनी आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या सर्वच फेरीत धोत्रे आघाडीवर होते. अखेर 28 व्या फेरीत अनुप धोत्रेंनी विजय मिळवला. यांच्या विजयामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

अकोला मतदारसंघ हा राज्यातील अनेक चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक होता. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 4 निवडणुकांपासून इथं भाजपचा खासदार आहे. भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या चार निवडणुका जिंकून अकोल्याचा बालेकिल्ला राखला होता.आता त्यांच्या मुलानेही अकोल्याचा गड कायम राखला.

मी निराश झालो आहे, पण… – आंबेडकर
अकोल्यातील झालेल्या पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलं की, लोकसभा निवडणुकीत अकोला आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक VBA कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाटी आणि पक्षाप्रती ठोस समर्पम केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला, असं आंबेडकर म्हणाले.

तसेच, पक्षाला विजय न मिळाल्याने मी निराश झालो आहे, पण मी आशा सोडलेली नाही. मी आणि माझे सहकारी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करूनभविष्यात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू, असं आंबडेकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज