अकोल्यात भाजपला बंडखोरीचे ग्रहण ! अनुप धोत्रेंविरुद्ध गव्हाणकरही मैदानात उतरले
Narayanarao Gavhankar will contest Akola Loksabha : लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यांतर सर्वच पक्षात डावलले गेलेल्या नेत्यांची नाराजी उफाळून बाहेर येत आहे. अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रेंना (Anup Dhotre) उमेदवारी जाहीर केल्यांतर भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर (Narayanarao Gavhankar) यांनी बंडाचे संकेत दिले होते. दरम्यान, आज गव्हाणकरांनी अकोल्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
‘पावसाच्या अंदाजासारखाच मतरुपाने पाऊस पाडा’; पंजाबराव डख यांची परभणीकरांना साद
गव्हाणकर हे तिकीट वाटपावरून भाजपवर नाराज होते. अकोल्यातून भाजपच्या तिकीटावर लढण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र, भाजपने त्यांना तिकीट डावललं. त्यामुळं गव्हाणकरांनी आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आत ते अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. गव्हाणकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
नारायण राणेंकडून प्रचाराला सुरूवात, रत्नागिरी-सिधुदुर्गवर आमचाच हक्क; उदय सामंतांनी ठणकावलं
गव्हाणकर हे 1995 आणि 2004 मध्ये दोन वेळा भाजपकडून बाळापूरचे आमदार राहिलेले आहेत. ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्षही होते. 2004 मध्ये लोकसभेसाठी गव्हाणकर सक्षम उमेदवार होते. मात्र, तेव्हा त्यांना डावलून संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली गेली. तर आता संजय धोत्रेंच्या तब्येतीचं कारणं देत अनुप धोत्रेंना उमेदवारी जाहीर झाली. यावेळी तरी आपल्याला उमेदवारी जाहीर होईल, असं गव्हाणकरांना वाटतं होतं.
गव्हाणकर यंदा अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र त्यांची उमेदवारी पक्षाने नाकारल्यानंतर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. आणि आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता उमेदवारी मागे घेणार नसल्याचे गव्हाणकरांनी स्पष्ट केले. दरम्यान, गव्हाणकर यांच्य अपक्ष उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता भाजप गव्हाणकरांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.