लोकसभेचा गुलाल हुकला पण विधानसभेचा गुलाल आपलाच; जगतापांनी फुंकले रणशिंग
Ahmednagar : खरंतर लोकसभा निवडणुका झाल्या मात्र आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections)आहेत. त्यावर चर्चा होणे महत्त्वाचे आहे. कोणता पक्ष कोणाबरोबर गेला, हे सगळे जनतेला माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सोडून द्या. लोकसभेचा (Loksabha Election)गुलाल हुकला पण विधानसभेचा गुलाल आपलाच आणि अशा शब्दात एक प्रकारे अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे (NCP)आमदार संग्राम जगताप (sangram Jagtap)यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते बैठकीत बोलत होते.
“आम्हाला माफ करा अन् १८०० कोटी घ्या”; बायडेनची युक्रेनकडे जाहीर माफी, रशियालाही इशारा
युतीचे सरकार होते मात्र अजित पवार (Ajit Pawar)हे सरकारमध्ये गेल्यानंतर आता महायुती झाली आहे. अजित पवार यांनी सर्वाधिक निधी अहमदनगर जिल्ह्यात दिलेला आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही अधिकार आहे की, उमेदवार म्हणून उभे राहायचे. मला वाटतं निवडणुकांमध्ये आपली दिशा काय असणार आहे? आपली ध्येय धोरणे काय आहेत? यावर ती आता चर्चा करणे महत्त्वाचे आहे, असेही यावेळी संग्राम जगताप म्हणाले.
अनेक बुरुज ढासळले, मशाली विझल्या मात्र वादळात मी दिवा लावला, मानेंची जोरदार फटकेबाजी
लोकसभेचा गुलाल हुकला पण विधानसभेचा गुलाल आपलाच
लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र यामध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही, यामध्ये आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली ध्येय धोरणे, नवी दिशा बघितली पाहिजे. नगर जिल्ह्यातून 2019 च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले.
2024 च्या निवडणुकीत देखील जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून येतील. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे देखील यावेळी जगताप म्हणाले. अजित पवारांच्या हात बळकट करण्यासाठी आमदारांच्या रूपाने मदत कशी करता येईल? याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही यावेळी आमदार जगताप म्हणाले.
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगितले जाते. तो उमेदवार म्हणत नाही की कार्यकर्त्यांमुळे नेत्यांमुळे, तुमच्या आमच्यामुळे निवडून आलो, मात्र निवडणुकीत हार पत्कारावी लागल्यानंतर त्या उमेदवाराकडे कोणामुळे हरलो, याची मोठी लिस्ट तयार असते, असा टोलाही यावेळी संग्राम जगताप यांनी लगावला. त्यामुळे आता या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काम करा, असेही यावेळी आमदार जगताप म्हणाले.
प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अजितदादांनी मोठा निधी दिला आहे. अजितदादांनी फक्त अहमदनगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईपासून तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा निधी दिला आहे. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधव असेल वाडीवस्तीपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम अजितदादांनी केले आहे.
नगर शहरात 84 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर शहरातील सर्वच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये दोन-दोन कोटी रुपयांचा निधी अजितदादांच्या माध्यमातून दिल्याचेही यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.