“आम्हाला माफ करा अन् १८०० कोटी घ्या”; बायडेनची युक्रेनकडे जाहीर माफी, रशियालाही इशारा
Joe Biden Apologize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिल्यांदाच (Joe Biden) सार्वजनिक रूपात माफी मागितली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोडीमिर झेलेंस्की यांची भेट घेतल्यानंतर बायडेन म्हणाले की मागील सहा महिन्यांपर्यंत आम्ही युक्रेनला मदत (Ukraine) देऊ शकलो नाही. याचं आम्हाला दुःख आहे. आता सर्व मदत आम्ही लवकरात लवकर युक्रेनला देऊ. यानंतर बायडेन यांनी युक्रेनला तब्बल १८०० कोटी रुपयांच्या नव्या पॅकेजची घोषणा देखील केली.
रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिकेने (Ukraine Russia War) युक्रेनची बाजू घेतली. याआधी अनेक वेळा पैसे आणि लष्करी मदतही केली त्यामुळे हे युद्ध अजूनही सुरूच आहे. दोन वर्षांच्या काळात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले. शहरे उद्ध्वस्त झाली. मूलभूत सुविधांना मोठा फटका बसला. युद्धाला तोंड फोडलं म्हणून अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर कठोर (Russia) आर्थिक निर्बंध लादले. या सगळ्या नंतरही युद्धाचा निकाल लागलेला नाही. आता बायडेन यांच्या या नव्या घोषणेने युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. अमेरिकेकडून मिळणारी मदत रशिया विरुद्ध युद्धात वापरली जाणार आहे.
जो बायडेन यांनी याआधी युक्रेनसाठी ६१ मिलियन डॉलरची मदत जाहीर केली होती. मात्र रिपब्लिकन सदस्यांनी जोरदार विरोध केल्याने मागील सहा महिन्यांपासून ही मदत युक्रेनला देता आली नाही. बायडेन म्हणाले, अमेरिकी नागरिक अनेक वर्षांपासून युक्रेनच्या पाठीशी उभे आहेत. यापुढेही युक्रेनला अशीच साथ देत राहू. पॅकेज मिळाले नाही म्हणून युद्धाच्या मैदानात रशियाने आघाडी घेतली या गोष्टीचे आम्हाला दुःख असून याबाबत मी माफी मागतो, असे बायडेन म्हणाले.
युक्रेनवर सातत्याने आक्रमण होत आहे. दबाव वाढवला जात आहे तरीदेखील हिमतीने रशियाचा मुकाबला करत आहात. या कामगिरीसाठी तुम्ही कौतुकास पात्र आहात असे बायडेन युक्रेनचे झेलेन्स्की यांना उद्देशून म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर युक्रेनचे बळ वाढले आहे. यानंतर मागील आठवड्यात इटलीत पार पडलेल्या जी 7 देशांच्या परिषदेतही बायडेन आणि झेलेन्स्की यांची भेट झाली होती.
Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन
दरम्यान, अमेरिकेप्रमाणेच युरोपीय देशही यूक्रेनला मदत करत आहेत. आर्थिक निर्बंध टाकून रशियाची जप्त केलेल्या संपत्तीवरील व्याज देण्याचा प्लॅन या देशांनी नुकताच आखला आहे. तर दुसरीकडे फ्रान्सही युक्रेनला (France) मोठी मदत देण्याच्या तयारीत आहे. दोन्ही देशांत नुकतीच एक मोठी डील फायनल केली आहे. या करारानुसार फ्रान्सकडून युक्रेनला युद्धात वापरण्यासाठी हत्यारे पुरवठा केली जाणार आहेत.