अनेक बुरुज ढासळले, मशाली विझल्या मात्र वादळात मी दिवा लावला, मानेंची जोरदार फटकेबाजी

अनेक बुरुज ढासळले, मशाली विझल्या मात्र वादळात मी दिवा लावला, मानेंची जोरदार फटकेबाजी

Hatkanangale MP Dharishsheel Mane : लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये अनेक दिग्गज पराभूत झाले तर अनेकांना विश्वास वाटत नसताना ते विजयी झाले. दरम्यान, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी नुकतच एक आपल्या विजयावर भाष्य केलं आहे. माने म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढलो. (Dharishsheel Mane) मोठ्या ताकदीने या यशस्वी झालो. (Manoj Jarange) पश्चिम महाराष्ट्रात अनेक बुरुज ढासळले आणि मी वादळात दिवा लावला.

मशाल विझली

पुढे बोलताना माने म्हणाले, माझ्या मतदारसंघात दुपारपासूनच विरोधक गुलाल लावून फिरू लागले होते. त्यांना पाहून मलाच कळत नव्हतं की मतमोजणीच्या अद्याप काही फेऱ्या बाकी आहेत, तरी देखील यांनी आत्ताच जल्लोष करायला सुरुवात कशी काय केलीय? लोक सांगत होते, मशाल पेटली, मशाल पेटली. परंतु, संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि ती मशाल विझल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असा टोलाही माने यांनी यावेळी लगावला आहे..

एक्झिट पोल’मध्ये माझा विजय नव्हता समता च्या दबावातून भुजबळांचं प्रेशर पॉलिटिक्स; मंत्रिपदाचा राजीनामा की नुसतीच पोकळ हवा?

त्यानंतर दिवसभर गुलाल लावून फिरणारे विरोधक संध्याकाळी सांगत होते की ज्योतिबाला जाऊन आलो आहे. कारण अंगाला लावलेला गुलाल कोणाचा आहे हे ते सांगू शकत नव्हते. या निवडणुकीत लोकांमध्ये वेगळं वातावरण तयार झालं होतं आणि आपल्या मागं मोठी ताकदही नव्हती. कुठलाही साखर कारखाना, कुठलीही सूत गिरणी, दूधसंघ आपल्या पाठीशी नसताना आपण ही निवडणूक लढलो आणि जिंकलो. केवळ सामान्य माणसाच्या ताकदीमुळे आपण ही निवडणूक जिंकलो असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, कोणत्याही ‘एक्झिट पोल’मध्ये मी ही निवडणूक जिंकेन असं सांगितलं नव्हतं अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

निवडणूक म्हणजे मटका नव्हती महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?

माझे काही मित्र आहेत, मी त्यांचं नाव सांगणार नाही, ते मला सांगायचे की तुमचा दर खाली आहे, त्यामुळे तुम्ही निवडून येणार. मला ती गोष्ट समजायची नाही, दर खाली म्हणजे नेमकं काय? नंतर समजलं की हे लोक मटका खेळायचे. तुमचा दर खाली म्हणायचे आणि वर सांगायचे तुम्ही निवडून येणार. निवडणुकीच्या निकालानंतर मला कळलं मटका कसा लागतो. या मटका लावणाऱ्यांचं सर्वेक्षण वेगळं असतं. एक्झिट पोलचे सर्वेक्षण आणि यांचे सर्वेक्षण हे खूप वेगवेगळे असतात. हा चेष्टेचा विषय बाजूला सोडला तर ही निवडणूक म्हणजे मटका नव्हती. हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय होता. असंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज