Manoj Jarange: फडणवीस दुश्मन नाही; 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी सस्पेन्स वाढवाला

Manoj Jarange: फडणवीस दुश्मन नाही; 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी सस्पेन्स वाढवाला

Manoj Jarange On Obc Reservation : शंभू राजे आले त्यांनी शब्द दिला आहे, राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही काम करत नाही. राज्य सरकारवर विश्वास ठेवावा लागणार आहे. मागेपुढे सरकणे सुरू राहते, एक महिना त्यांना हवा होता दिला आता 13 जुलै पर्यंत काही बोलायचं नाही. (Obc Reservation) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे काय आमचे दुश्मन नाही, असे म्हणत 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी (Manoj Jarange ) सस्पेन्स वाढवाला आहे.

हाके यांच्या उपोषणावर : लोकशाहीत सगळ्यांना अधिकार…

हाके हे काय आमचे विरोधक नाही. आम्ही ओबीसी नेत्यांविरोधात काही बोलणार नाही. गावखेड्यात त्यांचे आमचे अनेकदा चांगले संबंध आहे. त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, जसे तुमचे लेकरं डोळ्यासमोर आहे तसे दुसरे लेकरं पण बघा, काळजावर हाथ ठेवून विचार करा, जी लोक विरोधात येतात त्यांचा विचार आम्ही करत नाही आणि करणार देखील नाही. CM थोडं ना जातीचा असतो ते सर्व समाजाचे असतात. 13 तारखेपर्यंत बोलायचं थांबू आम्ही, एक वर्ष झालं आंदोलनांना तरी आम्ही आता 13 जुलै नंतर बोलू असे मनोज जरांगे म्हणाले.

प्रकाश शेंडगे मागणीवर : 

त्यांना काय बोलू मी, महाराष्ट्रमध्ये सगळे उभे, तुम्ही तिकडून आम्ही इकडून, आणि ही ताकत त्यांनी आम्हाला विरोध करण्यापेक्षा ,रानावनात राहणाऱ्या धनगरसाठी आणि गोर गरिबांसाठी काम करा ना. विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकत लावा, गोर गरिबांसाठी काम करा. एस टी मधून धनगर बांधवांना आरक्षण साठी लढा ना. आम्हाला न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवसाठी लढा ना.

Devendra Fadnavis : सरकार सकारात्मक, जरांगेंनी उपोषणाचा निर्णय..; फडणवीसांनी केलं आवाहन

ओबीसी आंदोलनवर :

त्यांना उत्तर मी देणार नाही, माझा समाजाला मी आरक्षण मिळवून देण्यात खंबीर आहे. हे आयोग आणि कायद्यापेक्षा मोठे आहेत का. ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो की नाही ते सरकारला विचारावे. विरोधक मानले असते तर तोडीस तोड उत्तर दिले असते

माझा चित्रपट विरोध होतोय होऊ द्या मला त्यात रस नाही. माझं ध्येय एकाच माझ्या जातीसाठी आणि हिसका दाखवला तर मी मग सरकारला आणि विरोधकाला ही कळेल. कुणाला कुठे कुणाला पडायचं तर पाडा, आम्ही पण बघू नंतर समाज लढायला तयार आहे, 13 जुलै पर्यंत वाट पाहू असे यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज