राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?

  • Written By: Published:
राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी काही एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महायुतीची (Mahayuti) तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीची (MVA) सरकार येणार असल्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे आज (21 नोव्हेंबर) देखील दोन नवीन एक्झिट पोल समोर आले असून या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी टुडेज चाणक्य एक्झिट पोल (Today Chanakya Exit Poll) आणि ॲक्सिस माय इंडियाने (Axis My India) एक्झिट पोल जाहीर केले आहे.

टुडेज चाणक्य एक्झिट पोलने महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे तर महाविकास आघाडीला 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. याच बरोबर इतरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 13 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज टुडेज चाणक्य एक्झिट पोलने वर्तवला आहे.

तर दुसरीकडे ॲक्सिस माय इंडियाने देखील राज्यात महायुतीची सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला178-200 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडी सरकारला 82-102 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि इतरांना 6-12 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी 31 टक्के लोक एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना 18 टक्के आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 12 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. आज जाहीर झालेले दोन्ही एक्झिट पोल 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार असल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पीपल्स पल्स, मॅट्रिज आणि चाणक्य स्ट्रॅटेजीने महायुतीला बहुमत दिले आहे. तर पी-मार्क, दैनिक भास्कर आणि पोल डायरीने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

‘झालं इलेक्शन, जपा रिलेशन’ असा ध्यास धरत राहुल कलाटे पुन्हा जनसेवेत सक्रिय

मॅट्रीझ एक्झिट पोलने महायुतीला 150-170 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे तर महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर इतरांना 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पीपल्स पल्सने एनडीएच्या महायुतीला 175-195 जागा दिल्या आहे तर महाविकास आघाडीला 85-112 जागा आणि 7-12 इतरांना दिल्या आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube