शरद पवार यांच्यावर टीका का करत नाही? CM एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
Eknath Shinde Reaction On Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचार सभा घेत होते. माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साम मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचं राजकारण, विधानसभा निवडणूक, महाविकास आघाडी, भाजप या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका का करत नाही? असा सवाल विचारला गेला होता. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर (Maharashtra Politics) जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय सावधगिरीने वागतात. त्यांची अत्यंत सावध भूमिका आहे, असं म्हटलं जातं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार यांच्यावर मी टीका का करू? मी कोणावरही टीका करत नाही, फक्त जे माझ्यावर बोलतात त्यांना उत्तर देतो. परंतु हे उत्तर मी माझ्या कामातून देतो, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
एक लाखाच्या मताधिक्याने शंकर जगताप विजयी होतील, खासदार श्रीरंग बारणे यांनी केला विश्वास व्यक्त
मागील दोन वर्षात माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीचे आरोप झाले, परंतु त्यांना कधीही मी प्रत्युत्तर दिलेलं नाही. मी कोणाच्याही आरोपांना विचलित होत नाही. मी आपलं काम करत राहतो, याचच टेन्शन विरोधकांना आहे. मी नवनवीन योजना राबवत असून त्याचा फायदा जनतेला होतोय. जनता आमच्या कामामुळे खुश आहे अन् तेच महत्वाचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. बाकीच्यांशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे.
धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय ; तिजोरी दाखवत राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री पदासाठी आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. तर आमच्यात स्पर्धा महाराष्ट्र राज्य पुढे नेण्यासाठी आहे. महाराष्ट्रात विकास करण्यासाठी आमच्यात स्पर्धा आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेसाठी नंतर आम्ही बोलू. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलीय. यावेळी शिंदे यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलंय. कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.