महाराष्ट्राची महायुतीला साथ, आघाडी वीसच्या आत; ‘या’ चार एक्झिट पोलचा अंदाज काय?
Lok Sabha Election Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात मतदान (Lok Sabha Election Exit Poll 2024) झाल्यानंतर अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात पुन्हा एकदा देशात एनडीए सत्तेत येतील. तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजनाम होतील, असा एक्झिट पोल आहे. हिंदी बेल्टमधील राज्यांनी पुन्हा एकदा मोदींवर विश्वास ठेवला आहे.
एक्झिट पोलने महाराष्ट्र कुणाला साथ देणार याचा अंदाज बांधला आहे. काही एक्झिट पोल्सने महाविकास आघाडी तर काही पोलमध्ये महायुती विजयाचा गुलाल उधळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर टीव्ही 9 पोलस्टारने महाविकास आघाडी विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज
टुडेज चाणक्यच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 28 ते 38 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 10 ते 20 जागा मिळतील असा अंदाज आहे. न्यूज 18 पोल हबनुसार महायुतीला 32 ते 35 तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. एनडीटीव्ही जन की बातनुसार राज्यात महायुतीला 34 ते 41 जागा तर महाविकास आघाडीला 9 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक भारत मेट्रीजनुसार महाराष्ट्रात महायुतीला 30 ते 36 जागा तर महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे.
टीव्ही 9 पोलस्टारने मात्र वेगळा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे सगळे मतमोजणीच्या आधीचे फक्त अंदाज आहेत. खरा निकाल चार जूनच्या मतमोजणीनंतरच कळणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या जनतेनं कुणाला कौल दिला याचं उत्तर मिळणार आहे.
Exit Poll : मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार; ‘इंडिया’चीही टफ फाइट
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आल. आज शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा होता. या टप्प्यातील मतदान सायंकाळी सहा वाजता संपलं. त्यानंतर थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडी पुन्हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे तर विरोधी इंडिया आघाडीही जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
मागील एक्झिट पोल खरे ठरले
2019 मध्ये निकालाआधी जे एक्झिट पोल जाहीर केले होते ते खरे ठरले होते. या एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर मतमोजणी झाली आणि हा अंदाज खरा असल्याचे सिद्ध झाले होते. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303 जागा मिळवल्या होत्या तर एनडी आघाडीला एकूण 353 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या. तर पूर्ण युपीए आघाडीला 91 जागा मिळाल्या होत्या. 2014 मधील निवडणुकीत भाजपला एकूण 282 जागा मिळाल्या होत्या.