Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात महायुतीला धक्का! पवार- ठाकरे यांची कमाल; वाचा आकडे

Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात महायुतीला धक्का! पवार- ठाकरे यांची कमाल; वाचा आकडे

Maharashtra Loksabha Election Exit Poll 2024 Mahayuti or MVA : लोकसभेच्या निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आज आलेल्या एक्झिट पोलकडे ( Exit Poll 2024 ) राज्यसह सर्व देशाचे लक्ष लागले होते. त्यामध्ये 48 मतदारसंघ असणाऱ्या महाराष्ट्राचा कौल लोकसभेसाठी महत्त्वाचा ठरणार आहेत. दरम्यान या एक्झिट पोलच्या आकड्यांमधून महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती कुणाला यश मिळणार? याचा अंदाज समोर आला आहे.

मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, दक्षिण भारतातही खातं उघडणार; ‘इंडिया’चीही टफ फाइट

या आकडेवारीवरून लोकसभेच्या 4 जूनला लागणाऱ्या निकालामध्ये जनतेचा कौल कुणाला मिळणार याचा प्राथमिक अंदाज आला आहे. या आकडेवारीमध्ये Tv9 पोलस्ट्राट, पीपल इनसाईट्स, एबीपी सी व्होटर यांच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये एबीपी सी व्होटर यांच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांना फिफ्टी-फिफ्टी जागा मिळतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी सी व्होटर –

त्यामध्ये भाजपला 17 जागा मिळतील ज्या 2019 च्या तुलनेत जागा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर शिंदेंच्या शिवसेनेला 6 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता एबीपी सीव्होटर यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर इकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला 9 जागा शरद पवार यांचे राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 8 जागा मिळतील अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला जात आहे.

द स्ट्रेलेमा –

द स्ट्रेलेमा यांच्या पोलनुसार राज्यामध्ये महायुतीला 24 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 20 ते 23, तसेच सांगलीमध्ये एक अपक्ष म्हणजे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडणुक लढवणारे विशाल पाटील हे निवडून येऊ शकतात. तर वंचितला या पोलनुसार राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज तक अॅक्सिस माय इंडिया –

महायुती – 38-42
महाविकास आघाडी – 6-10

इंडिया टिव्ही –

महायुती – 34
महाविकास आघाडी – 14

टाईम्स नाऊ व्हिएमआर –

महायुती – 38
महाविकास आघाडी – 10

महाराष्ट्रमध्ये लोकसभा निवडणूक एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये विभागलेली होती. एकीकडे महायुतीमध्ये भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी. असे पक्ष विभागले गेले होते. त्यामुळे 2014 किंवा 2019 यापेक्षा 2024 ची निवडणूक महाराष्ट्रासाठी वेगळी ठरली.

Loksabha Exit Poll : बीडचा निकाल आला; पंकजा मुंडे पवारांच्या शिलेदारावर ठरतायत भारी

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पडलेली पक्षातील फूट या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरली. तसेच मराठा आरक्षणासाठीचा आंदोलन असो किंवा मराठा विरुद्ध ओबीसी या सर्व गोष्टींचा प्रभाव महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलेली आहे. या सर्व प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींचा फायदा नेमका कुणाला होणार? याचा प्राथमिक अंदाज या एक्झिट पोलच्या आकड्यांमधून समोर आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज