पाच कारणे ज्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपच विजयी होतो
Maharashtra Nagar Panchayat Election : राज्यातील 288 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज निकाला जाहीर होत
Maharashtra Nagar Panchayat Election : राज्यातील 288 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज निकाला जाहीर होत असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 288 पैकी 120 नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर बाजी मारली आहे. तर महायुतीमधील दुसरे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे. तर आता विरोधकांकडून प्रत्येक निवडणुकीत भाजपच का विजयी होतो? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या लेखात जाणून घ्या नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप विजयी होण्याचे पाच कारणे.
लाडकी बहीण योजना
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात राज्य सरकारकडून 1500 रुपये देण्यात येतात. नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत देखील या योजनेमुळे भाजपसह महायुतीला मोठा फायदा झाल्याचं दिसून येत आहे.
प्रचाराचं नियोजन
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील प्रचाराचं नियोजन दिसून आले. या निवडणुकीत भाजपकडून बुथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आले होते आणि याचा फायदा भाजपला दिसून देखील आला.
युतीचा निर्णय
नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती केली होती. तर काही ठिकाणी स्वयंबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा फायदा भाजपला झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रिंगणात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धक्का देत नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी राज्यातील अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत जनतेला भाजपला जिंकून देण्याचे आवाहन केले होते.
निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी
तर दुसरीकडे नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी भाजपने मेरिट लिस्टवरच उमेदवारी दिली होती. ज्याचा फायदा देखील भाजपला मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत झाला आहे.
