उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात महेश लांडगे गेम चेंजर, आळंदी नगर परिषदेमध्ये 15 जागांवर वर्चस्व
Mahesh Landge : राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून पुणे जिल्ह्यातील आळंदी
Mahesh Landge : राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून पुणे जिल्ह्यातील आळंदी नगर परिषदेमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी बाजी मारली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आळंदी नगर परिषदेत भाजपने 21 पैकी 15 जागा जिंकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
भाजपच्या विजयानंतर आळंदी नगर परिषदेत नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. भाजपकडून (BJP) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावर पुणे ग्रामीण निवडणूक (Pune Election) प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती.
या विजयानंतर माध्यमांशी बोलताना पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिमाखदार यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 288 पैकी भाजपा महायुतीने या घडीला 214 हून अधिक नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
भाजपा पक्षश्रेष्ठींनी माझ्याकडे पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. पक्ष संघटन आणि स्थानिक पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आणि विकासाच्या मुद्यांवर ही निवडणूक लक्षवेधी ठरली. आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आळंदीतील 21 पैकी 15 जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला. तसेच, आळंदी नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांचा बहुमताने विजय प्रस्थापित केला आहे.
‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ च्या मुद्यावर भाजपाला पहिली पसंती देणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पुण्यभूमी श्री क्षेत्र आळंदीतील हा महाविजय… भाजपा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि ज्या मतदारांनी पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवला त्यांना समर्पित करतो.
अशोक चव्हाणांना धक्का, लोहा नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव
माऊलींच्या आळंदीतील विजयाची आणि राज्यातील भाजपाच्या महाविजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत निश्चितपणे होईल, असा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी दिली.
उत्तर पुणे जिल्हा अंतिम निकाल
मंचर नगरपंचायत :अंतिम निकाल
नगराध्यक्ष : राजश्री गांजाळे – शिंदे शिवसेना
नगरसेवक पक्षीय बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी – 09
शिंदे शिवसेना – 03
ठाकरे शिवसेना – 01
शरद पवार राष्ट्रवादी – 01
अपक्ष – 03
एकूण – 17+1 नगराध्यक्ष
राजगुरूनगर नगरपरिषद – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : मंगेश शिंदे – शिंदे शिवसेना
नगरसेवक बलाबल
शिंदे शिवसेना – 11
अजित पवार राष्ट्रवादी – 5
भाजप – 3
अपक्ष – 2
एकूण नगरसेवक – 21+1 नगराध्यक्ष
चाकण नगरपरिषद – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : श्रीमती मनिषा सुरेश गोरे – शिवसेना धनुष्य (शिंदे शिवसेना उमेदवारास ठाकरे सेना चा पाठिंबा)
नगरसेवक बलाबल
शिंदे शिवसेना – 13
भाजप – 00
अजित पवार राष्ट्रवादी – 10
ठाकरे सेना – 1
काँग्रेस – 00
अपक्ष – 1
एकूण नगरसेवक – 25 + नगराध्यक्ष
—————————
जुन्नर नगरपरिषद – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : सुजाता काजळे – शिंदे शिवसेना
नगरसेवक बलाबल
शिंदे शिवसेना – 8
भाजप – 2
अजित पवार राष्ट्रवादी – 6
ठाकरे सेना – 1
काँग्रेस – 1
अपक्ष – 2
एकूण नगरसेवक – 20+नगराध्यक्ष
——————
आळंदी नगरपरिषद अंतिम निकाल
नगराध्यक्ष : प्रशांत कुऱ्हाडे,भाजप
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी -02
भाजप -15
शिवसेना शिंदे-03
एकूण नगरसेवक -20+1 नगराध्यक्ष
तळेगाव नगरपरिषद – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : संतोष दाभाडे (कमळ – भाजप+अजित पवार राष्ट्रवादी)
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी – 17
भाजप – 10
अपक्ष – 1
एकूण नगरसेवक – 28 + 1 नगराध्यक्ष
वडगांव मावळ नगरपंचायत – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : अबोली ढोरे – अजित पवार राष्ट्रवादी
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी -9
भाजप -6
अपक्ष – 2
एकूण नगरसेवक -17+1 नगराध्यक्ष
लोणावळा नगरपरिषद – अंतिम निकाल
नगराध्यक्ष : राजेंद्र सोनवणे – अजित पवार राष्ट्रवादी
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी – 16
भाजप -04
अपक्ष – 03
उभाट — 01
काँग्रेस – 03
एकूण नगरसेवक -27+1 नगराध्यक्ष
