Kiran Mane : पक्ष प्रवेशानंतर किरण मानेंनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘परिवर्तनाच्या लढाईत… ‘

Kiran Mane : पक्ष प्रवेशानंतर किरण मानेंनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘परिवर्तनाच्या लढाईत… ‘

Kiran Mane : ‘’बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत (Shiv Sena Uddhav Thackeray) ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

एका दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने म्हणाले की,” मी अभिनयासह परिवर्तनाच्या लढाईत काम करत आहे. आजची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. आज आपल्याच माणसात फूट पाडली जात आहे. जातीधर्मावरुन द्वेश निर्माण केला जात आहे. या गढूळलेल्या आणि गलिच्छ वातावरणात खूप अस्वस्थता आहे. कलाकार हा कायम संवेदनशील असतो. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, पुल देशपांडे अशा अनेक मंडळींनी आजवर राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलेलं आहे.

“समाजामध्ये काम करायला एखादा राजकीय सपोर्ट असायला हवा, असं मला वाटलं. सडेतोड विचार मांडायला राजकीय प्लॅटफॉर्म हवाच होता. त्यामुळे त्यातल्या त्यात योग्य पक्षाची मी निवड केली आहे. आज या व्यवस्थेविरुद्ध सडेतोड लढणारे कोण आहेत? या व्यवस्थेचा सगळ्यात जास्त डॅमेज कोणाला झाला आहे तर ते फक्त उद्धव ठाकरेंना. ठाकरेंची सेना मला कायम आपलीशी वाटली आहे. उद्धव ठाकरे हे खूप संवेदनशील आहेत. ठाकरे घराण्याने अनेक मराठी कलाकारांना आदराचं स्थान दिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नाना पाटेकरांपर्यंत अनेक वेगवेगळ्या कलाकारांना ठाकरे कुटुंबियांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिल्याचे मी जवळून अनुभवलं आहे. त्यामुळे मला उद्धव ठाकरेंची ओरिजनल शिवसेना खूप आपलीशी आणि जवळची कायम वाटते, यावेळी सांगितले आहे.

Kiran Mane : किरण मानेंची राजकारणात एन्ट्री; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधणार शिवबंधन

किरण मानेंनी राजकारणात एन्ट्री केल्याने ते मनोरंजनसृष्टीपासून दूर जाणार का? अशी शक्यता चाहत्यांनी वर्तवली जात आहे. याबद्दल बोलत असताना त्यांनी थेटच सांगितले आहे की, अभिनयप्रवासाला कधीही ब्रेक लागणार नाही. राजकारण सांभाळून अभिनय करत राहणार. नाटक, सिनेमा आणि सिरीयल या गोष्टी सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सध्या अभिनयासह राजकारणालाही प्राधान्य दिलं जाणार आहे. लवकरच मी एक नाटक करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज