MLA Sangram Jagtap : नगरकरांना वेठीस धरु नका, आमदार संग्राम जगतापांनी सुनावलं…

MLA Sangram Jagtap : नगरकरांना वेठीस धरु नका, आमदार संग्राम जगतापांनी सुनावलं…

नगरकरांना वेठीस धरु नका, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. सध्या नगर शहरांत घडत असलेल्या घटनांवर आमदार जगताप यांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, शहरांत घडत असलेल्या घटनांवर भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. राणे यांनी पीडितांची भेट घेतल्यानंतर आमदार जगताप यांच्यावर निशाणा साधला. त्यावरही संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिलंय.

आमदार जगताप म्हणाले, राजकारणाचा अजेंडा (Political Agenda) समोर ठेवत स्थानिक मंडळींकडून अहमदनगर शहरात अशांतता पसरवण्याचं काम सुरु असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. शहरात सध्या घडत असलेल्या घटना त्याचंच उदाहरण असून काही राजकीय मंडळी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यामातून अशा घटना घडवून आणत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

राणेंच्या नजरेचं मला काय? मला नगर महत्वाचं…

तसेच काही स्थानिक राजकीय मंडळींकडून जनमतासाठी एका विशिष्ट वर्गाचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वसामान्यांसह शहरातील लोकांना वेठीस धरलं जात आहे. अशा घटना 10 वर्षांपूर्वी सातत्याने घडत होत्या. नंतरच्या काळात त्या मंडळींना त्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत. या मंडळींचा विशिष्ट वर्गाचा पाठिंबा मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असून तो विशिष्ट वर्ग सुज्ञ असून त्यांच्यामागे जाणार नसल्याचंही जगताप यांनी स्पष्ट केलंय.

कॅबिनेटने मंजुरी दिली, ते ‘नॅशनल क्वांटम मिशन’ आहे तरी काय?

एकंदरीत या संपूर्ण घटना घडल्यानंतर काल काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनगरला आले असता त्यांनी आमदार जगतापांना डिवचलं. त्यावर आमदार जगताप म्हणाले नितेश राणे यांच्याशी माझा वैयक्तिक वाद नसून कोणतं भांडणही नाही. आमदार राणे यांनीही राजकारणाचा अजेंडा समोर ठेवत माझ्याबद्दल वक्तव्य केल्याचं आमदार जगताप यांनी स्पष्ट केलंय.

Nysa Devgn: न्यासाकडून पैशांची उधळणपट्टी, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

अहमदनगर शहरांत अशा घटना घडल्यापासून जखमींना रुग्णालयात नेण्यापासून ते आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करीत असून पीडित कुटुंबियांच्या भावना समजून घेत त्यांना आधार देण्याचं काम आम्ही करीत असतो. मात्र, सत्ताधारी नेत्यांकडून दबाव असल्याने पोलिसांचा तपास पुढे जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही बिनविरोध; पंकजांच्या ताब्यातील शिक्षण संस्थेत नवे राजकारण

नगरच्या कापड बाजारपेठेत दुकानासमोर बॅरिकेड लावण्यावरुन दोन व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादानंतर एका गटाने व्यापाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर नगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच घटनेतील पीडिताच्या कुटुंबियांनची भेट घेण्यासाठी आमदार नितेश राणे अहमदनगरला आले. त्यावेळी घेतलेल्या छोटेखानी सभेत त्यांनी आमदार जगताप यांच्यावर निशाणा साधला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube