Nysa Devgn: न्यासाकडून पैशांची उधळणपट्टी, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T173717.165

Nysa Devgn: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgn) ही फिल्म इंड्रस्टीमध्ये (Film industry) पाऊल ठेवण्या अगोदरच ती सतत चर्चेत येत आहे. न्यासा सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकवेळा ती वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असल्याचे देखील दिसून येत आहे. तिच्या वागण्यामुळे ती नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


आता तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे, तो व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा चाहत्यांनी तिला ट्रोल करायला जोरदार सुरुवात केली आहे. न्यासा अनेकवेळा विविध कारणांमुळे बाहेरगावी जात असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच ती विमानातून मुंबईबाहेर गेली असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून आली आहे. यावेळचा तिचा हा व्हिडीओ खूपच चर्चेत येत आहे.

या व्हिडिओमध्ये बाहेर जात असताना तिने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. तर ती खूप घाईत जात असल्याचे देखील दिसून येत आहे. पण तिचा हा अॅटिट्यूड चाहत्यांना मात्र फारसा आवडला नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी त्यावर अनेक कॉमेंट्स केल्या आहेत.

Sunny Singh: ‘… म्हणून प्रभास सुपरस्टार बनला, सनी सिंहने सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

 

एका यूजरने लिहीले आहे की, “जगातलं सर्वात चांगलं काम काय आहे? आई- वडील तुला खर्च करता यावेत म्हणून उत्तम पैसे कमवतात आणि तुला फक्त आराम करत, चांगलं चांगलं खात आयुष्य घालवायचं आहे.” तर दुसरा यूजर म्हणाला, “ताई नेहमीच घाईत असतात.” तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “अभ्यास करून शिकण्याच्या ऐवजी ही सारखी कुठे फिरत असते? असे अनेक सवाल करत तिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता तिचा हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पण तिच्या या अॅटिट्यूडमुळे तिला सतत ट्रोलिंग केला जात आहे.

Tags

follow us