Sunny Singh: ‘… म्हणून प्रभास सुपरस्टार बनला, सनी सिंहने सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट
Sunny Singh On Prabhas: दाक्षिणात्य कलाविश्वातील बाहुबली अर्थात अभिनेता प्रभास (Prabhas) याची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush ) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सनी सिंगला (Sunny Singh) लक्ष्मणच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा पात्रात सनी पहिल्यांदाच दिसणार आहे.
View this post on Instagram
अलीकडेच सनीने बाहुबली अर्थात अभिनेता प्रभाससोबत (Prabhas) चित्रपटात काम करण्याचा त्याचा अनोखा अनुभव शेअर केला आहे. म्हणाला ‘सेटवर प्रभास नेहमीच माझ्यासाठी मोठ्या भावासारखा होता. आपण अभिनेते आहोत असे मला कधीच वाटले नाही. तो सेटवर सगळ्यांची काळजी घेत असे. तो अतिशय नम्र आहे आणि त्याचा हा गुण त्याला सुपरस्टार बनवतो.
सनीने पुढे सांगितले की तो नेहमी सेटवर वेळेवर पोहोचायचा आणि खूप व्यवस्थित त्याची सगळ्यांशी वागणूक होती. ओम राऊ दिग्दर्शित हा चित्रपट 16 जून 2023 रोजी सर्व सिनेमागृहात दाखल होणार आहे.
Sunny Singh: ‘… म्हणून प्रभास सुपरस्टार बनला, सनी सिंहने सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट
या कारणाने चित्रपटाची तारीख पुढे
गेल्या वर्षी जेव्हा टीझर रिलीज झाला होता, तेव्हा चित्रपटाबाबत बराच वाद निर्माण झाला होता. लोकांचा नकारात्मक प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी चित्रपटात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले आहे की, निर्मात्यांना चित्रपटाच्या व्हिज्युअलवर काम करण्यासाठी अधिक वेळ घ्यायचा आहे.
या चित्रपटाची कल्पना ओम राऊत यांना जपानी अॅनिमेटेड फिल्म रामायण पाहिल्यानंतर सुचवली. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी चित्रपटाची संपूर्ण कथा लिहिली. तसेच चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे, त्यापैकी 250 कोटी रुपये VFX कामावर खर्च करण्यात आले आहेत.