Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द

Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द

Ajit Pawar Promised to voters in Baramati : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील बारामती मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची आणि पवार कुटुंबामध्ये होणार आहे. त्यामुळे येथे एकीकडे अजित पवार ( Ajit Pawar ) आणि दुसरीकडे उर्वरित पवार कुटुंब जोरदार प्रचाराला लागलं आहे. त्यामध्ये आज अजित पवार यांनी पुन्हा बारामतीमधील ( Baramati ) नरसापूर येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर टीका करत मतदारांना वचन दिलं. ते म्हणाले की, मी शब्द देताना 10 वेळा विचार करतो. तर एकादा शब्द दिला तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही.

सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, लवकरच सर्वांना…

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आपल्या मतदारसंघांमध्ये आर्थिक सुबत्ता आणायची असेल, तर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी त्यांच्या विचारांचा खासदार देणे गरजेचे आहे. तर बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना आम्ही उमेदवारी दिली आहे.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, माजी मुख्यमंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

या अगोदर तुम्ही जो खासदार निवडून द्यायचा. त्यांनी या भागात काय काम केले? कोणीही सांगा. कारण भाषण देऊन प्रश्न सुटत नसतात. मलाही चांगली भाषण येतात. पण मी त्याबरोबर काम देखील करतो. तसेच अजित पवार शब्दाचा पक्का आहे. एकतर मी शब्द देताना दहा वेळा विचार करतो. आणि शब्द दिला तर कोणाच्या बापाचं हे ऐकत नाही. त्यामुळे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता आणण्याची ही संधी आहे. तरच आपल्या मतदारसंघात पैसा येईल. तरच विकास होईल. अजित पवार यांनी मतदारांना सुनील पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज