‘पावसाच्या अंदाजासारखाच मतरुपाने पाऊस पाडा’; पंजाबराव डख यांची परभणीकरांना साद

‘पावसाच्या अंदाजासारखाच मतरुपाने पाऊस पाडा’; पंजाबराव डख यांची परभणीकरांना साद

Punjabrao Dakh : मी नेहमी पावसाचा अंदाज सांगतो, आता मतरुपी पाऊस पाडून विजयी करा, अशी साद हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी परभणीकरांना घातली आहे. दरम्यान, पंजाबराव डख यांना वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha) उमदेवारी जाहीर झाली आहे. डख यांनी उमेदवारी जाहीर होताच आपला अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत परभणीकरांना साद घातली आहे.

भावना गवळी बहीणच, मला समजून घेईल; राजश्री पाटलांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. परभणी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजय बंडू जाधव तर महायुतीकडून महादेव जानकर यांना उमदेवारी देण्यात आली आहे. दुरंगी लढतीचं चिन्ह दिसत असतानाच वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आधी उगले यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करुन प्रकाश आंबेडकरांनी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जाधव-जानकरांपाठोपाठ वंचितकडून डख यांना मैदानात उतरवण्यात आल्याने ही चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.

कारवायांपासून लपण्यासाठी आमच्यातले नेते सत्तेत, रोहित पवारांचा अजितदादा गटावर हल्लाबोल

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंजाबराव डख म्हणाले, मला वंचित बहुजन आघाडीकडूनच उमेदवारी हवी होती. मी आधीपासूनच वंचितच्या तिकीटावरच निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित केलं होतं. उमेदवारीसाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांची यांची भेट घेतली होती. मी लोकसभेत गेलो तर राज्यातील मुस्लिम, मराठा, धनगर, दलित बांधवांचे प्रश्न मांडू शकतो, यासोबतच परभणीतील पाणी प्रश्न, एमआयडीसी, हमी भावासाठी लढू शकतो, असं हवामान डख म्हणाले आहेत.

महादेव जानकरांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात, माढ्यातून निवडणूक लढणार असल्याची केली घोषणा

सध्या परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार हे महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार आहेत. पंजाबराव डख हे मूळचे परभणीचेच आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. डख परभणीतल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात, त्यामुळे यंदा त्यांनाच निवडून देणार असल्याचं भावना परभणीकरांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मी एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. याआधीच्या काळातही मी तुमची सेवा करीत होतो. आता यापुढेही आयुष्यभर करीत राहणार आहे. मी नेहमी पावसाचा अंदाज सांगतो, आता मतरुपाने पाऊस पाडून मला विजयी करण्याचं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज