‘त्या’ भीमसैनिकाला हार्ट अटॅक की पोलिसांकडून हत्या? वडेट्टीवारांना दुसराच संशय
Vijay Wadettiwar : परभणीतील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आलं. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शंका उपस्थित करत पोलिसांवरच गंभीर आरोप केला. सोमनाथ सुर्यवंशी यांचा हा मृत्यू नाहीतर पोलिसांनी केलेली हत्या आहे का, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी केला.
‘तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय’; मनोज जरांगेंचं भुजबळांना थेट उत्तर
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आमदार वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येसंदर्भात भाष्य केलं. परभणी प्रकरणातील मृत भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली ही हत्या आहे का? असा सवाल त्यांनी केला. पुढं त्यांनी लिहिलं की, सुर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले आहे. एखाद्याचा जीव जावा इतकी मारहाण पोलिसांनी का केली? पोलिसांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले होते? पोलिसांना काय लपवायचे होते?, असे सवाल वडेट्टीवार यांनी केले.
परभणी प्रकरणातील मृत भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली ही हत्या आहे का?
सुर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले आहे. एखाद्याचा जीव जावा इतकी मारहाण पोलिसांनी का केली? पोलिसांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले होते? पोलिसांना काय… pic.twitter.com/v3qOdbRn79
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 16, 2024
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची उसाची पहिली उचल 2800 रूपये प्रतिटन; आमदार आशुतोष काळे
त्यांनी पुढं लिहिलं की, अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांना अनेक जखमा झाल्याचा उल्लेख आहे आणि पोलीस सांगत होते हार्ट अटॅक आला? यावरून पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आंबेडकरी जनतेवर बळाचा वापर करत होते, मारहाण करत होते याचे व्हिडिओ सुर्यवंशी यांनी काढले हा राग पकडून पोलिसांनी सुर्यवंशी यांना अमानुष मारहाण केली का ?, असंही वडेट्टीवार म्हणाले.
सोमनाथ सुर्यवंशी यांचा हा मृत्यू नाहीतर पोलिसांनी केलेली हत्या आहे का, असा प्रश्न आज निर्माण होत आहे. या प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकारी निलंबित झालेच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनीही X वर पोस्ट करत लिहिलं की, परभणी येथील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला. कायद्याचे शिक्षण घेणारा हा तरुण ‘न्यायालयीन कोठडीत’ मरण पावतो, ही अजूनच गंभीर बाब आहे, तो मेला की त्याला मारण्यात आले, हे शवविच्छेदनानंतर कळेल… पण समाज म्हणून हाच प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो… असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमावणार आहेत?