“पंकजा मुंडे भाजप सोडा, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा” काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून मोठी ऑफर!

Congress Offers Chief Minister's Post to Pankaja Munde पंकजा मुंडेंना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Pankaja Munde: पंकजा मुंडे भाजप सोडा, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून मोठी ऑफर

Congress Offers Chief Minister’s Post to Pankaja Munde : मंत्री व भाजप आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राजकारणातून एक्झीट घेण्याबाबत मोठे विधान केले होते. बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमादरम्यान एका कवीने राजकारणातील विसंगती, विलंब आणि व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करणारी कविता सादर केली. या कवितेतील आशयाला पंकजा मुंडे यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेले भाष्य अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

बांकीपूरमध्ये भाजपचा बालेकिल्ला ढासळला? प्रशांत किशोर 18 व्या फेरीनंतर 10 हजार मतांनी आघाडीवर

कवितेचा संदर्भ देत पंकजा मुंडे म्हणाल्या, मला जर राजकारण माझ्यासारखं वाटलं नाही, माझ्या विचारांशी ते समरस नाही असं वाटलं, तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो व्यक्ती बाहेर पडण्याची तयारी ठेवतो, तोच निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे राजकारण करू शकतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पंकजा मुंडेंना थेट मोठी ऑफर दिली. पंकजा मुंडेंनी भाजपची (BJP) साथ सोडून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या या समर्थनाने तर राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगायला लागली आहे.

‘आग विझवण्याएेवजी भडकवत होते…’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील याचिकेवर सरन्यायाधीश तातडीने सुनावणी घेणार

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ओबीसी (OBC) नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम सुरु झाले आहे, पक्षात न्याय मिळत नसल्यास, पक्ष विचारांशी समरस होत नसल्यास अशी भावना येणे स्वाभाविक आहे. आमची पंकजा मुंडे यांना विनंती आहे की, त्यांनी भाजपमधून बाहेर पडून आता राज्याचे नेतृत्व करावे, त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनावे, यासाठी आमचा त्यांना पुर्णपणे पाठींबा राहिल. फक्त त्यांनी भाजपमधून बाहेक पडून मैदानात उतरावे आम्ही त्यांना काँग्रेसमध्ये घेऊ. त्या काँग्रेसमध्ये आल्यास वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून नक्कीच यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे पंकजा मुंडे यावर काय निर्णय घेतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तुम्ही तुमची पदवी जाहीर करा मी माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करतो, अभिजीत दिपकेंचं पंतप्रधानांना आव्हान

तसेच देवेंद्र फडणवीस एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असे देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) चुलते बाळासाहेब फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही वडेट्टीवारांनी भाष्य केलं. नातेवाईकाला किंवा भावाला असे वाटणे स्वाभाविक आहे. पण शेवटी त्यांच्या पक्षात निर्णय घेणारे दोघेही गुजरातचे आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) हटवून कोणताही मराठी माणूस पंतप्रधान झाला, तर आम्हाला आनंद होईल, असेही विजय वडेट्टीवा म्हणाले.

महत्वाची बातमी: गॅस कनेक्शन धारकांनी ‘या’ तारखेआधी LPG e-KYC करावी अन्यथा….

follow us