कारवायांपासून लपण्यासाठी आमच्यातले नेते सत्तेत, रोहित पवारांचा अजितदादा गटावर हल्लाबोल

कारवायांपासून लपण्यासाठी आमच्यातले नेते सत्तेत, रोहित पवारांचा अजितदादा गटावर हल्लाबोल

Rohit Pawar: भाजपच्या (BJP)मोठ-मोठ्या नेत्यांना असं वाटतं की, पवार कुटूंब फोडलं म्हणजे झालं. तीन-चार पवार फोडले असतील. पण शरद पवारांचं (Sharad Pawar)कुटूंब हे फक्त पवार आडनावाचं नाही. या महाराष्ट्रामध्ये राहणारे स्वाभिमानी नागरिक आहेत, ते म्हणजे शरद पवारांचं कुटूंब आहे. अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या. कारवाईपासून लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी आमच्याकडचे अनेक नेते त्यांच्याबरोबर सत्तेत जाऊन बसले आहेत, अशी घणाघाती टीका आमदार रोहित पवार Rohit Pawarयांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर केली आहे.

सुधीर मुनगंटीवारांसाठी PM मोदींची चंद्रपुरात पहिली सभा; प्रचाराचं रणशिंग फुंकणार

आमदार रोहित पवार म्हणाले की, भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही कदाचित नेत्यांना घेतलं असेल. जे पळणारे होते ते तुमच्याकडे आले आहेत. आमच्याकडं राहिलेले लोक हे लढणारे लोक राहिले आहेत. भाजपसोबत गेलेले लोक त्यांच्यापुढं फक्त झुकत नाहीत तर लोटांगण घालत आहेत. पक्षाला तिकीट मिळण्यासाठी लोटांगण, पद मिळण्यासाठी लोटांगण आणि अजून काय काय मिळण्यासाठी लोटांगण घालतील ते माहित नाही.

‘साखरपुडा झाला पण, लग्न झालं नाही, हातकणंगलेची चर्चा कुठं अडली?’ सतेज पाटलांनी काय सांगितलं?

बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज, 4 एप्रिलला बुलढाण्यात नेत्यांची मांदियाळी जमली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्यांनी जंगी शक्तीप्रदर्शन केले.

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, आमदार राजेश एकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज