सुधीर मुनगंटीवारांसाठी PM मोदींची चंद्रपुरात पहिली सभा; प्रचाराचं रणशिंग फुंकणार

सुधीर मुनगंटीवारांसाठी PM मोदींची चंद्रपुरात पहिली सभा; प्रचाराचं रणशिंग फुंकणार

Loksabha Election 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur Loksabha) महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची जाहीर सभा पार पडणार आहे. येत्या 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरातील आयोजित प्रचारसभेत संबोधित करणार आहेत. तर येत्या 14 एप्रिल रोजी दीक्षाभूमीलाही भेट देणार असून रामटेकमध्येही जाहीर सभेला मोदी उपस्थित राहणार आहेत.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

विदर्भातून भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडून अनेक शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजपने प्रचाराची सुरुवातच विदर्भातून करण्याची रणनीती आखली आहे. येत्या 8 एप्रिला रोजी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाहा विदर्भातून प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे अखेर प्रचाराच्या तोफा आता जोरदार सुरु होणार असल्याचं दिसून येत आहे.

पाठीशी अख्खा जिल्हा! भावना गवळींना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देऊ, समर्थकांचा इशारा

चंद्रपुरात महाविकास आघाडीकडून दिवंगत खासदार रविंद्र धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार हे निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच नागपुरातील रामटेकमधून काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून राजू पारवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले आहे. रामटेकमधून अपक्ष उमेदवार असलेले किशोर गजभिये यांना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता नागपूरमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात किरण सामंतांची विकेट? राणेंनी दावा ठोकताच निवडणुकीतून घेतली माघार

एकीकडे महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच आता प्रचाराची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपकडून प्रचाराची सुरुवात यंदा विदर्भातून करण्यात येत आहे. त्यासाठी भाजपने पहिला मतदारसंघ म्हणून चंद्रपुरची निवड केली असून सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मोदी शाहांसह महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून जोरदार ताकद लावण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज