पाठीशी अख्खा जिल्हा! भावना गवळींना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देऊ, समर्थकांचा इशारा
Yavatmal-Washim Loksabha Updates : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) अर्ज भरण्याची उद्या (४ एप्रिल) शेवटची तारीख आहे. मात्र, यवतमाळ-वाशिममध्ये (Yavatmal-Washim Loksabha) शिंदे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. विद्यमान खासदार भावना गवळींचं (Bhavana Gawali) तिकीट कापून संजय राठोडांना (Sanjay Rathod) तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गवळींना अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यानं गवळी समर्थक आक्रमक झाले आहेत. कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीमागे यवतमाळ-वाशीम जिल्हा, अशा आशयाचे पोस्टर व्हायरल झालेत.
सोनाक्षी सिन्हाने जॅमसोबत पार्टीत दाखवली जबरदस्त स्टाइल; ‘हिरामंडी’चे दुसरे गाणं रिलीज
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व खासदार भावना गवळी करत आहेत. त्या सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहे. मात्र, भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथे उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे, कारण भाजपच्या सर्वेक्षणात मतदारांचा गवळींना विरोध आहे. मात्र खासदार गवळी यांनाच महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी गवळी समर्थकांची आहे. गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी आली समोर! भाऊसाहेब वाकचौरेंच्या बैठकीत तुफान राडा
राठोड यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चत आहेत. त्यामुळं गवळी समर्थकांनी,कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीमागे यवतमाळ-वाशीम जिल्हा, अशा आशयाचं पोस्टर व्हायरल केलं.
भावना गवळी यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न मिळाल्याने त्यांनी काल पुन्हा मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेऊन मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री शिंदे नेमकी भावना गवळींना उमेदवारी देणार की संजय राठोडांना उमेदवारी देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.
मविआच्या उमेदवाराने भरला अर्ज
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार हे यवतमाळमध्ये आले होते. शक्तीप्रदर्शन करत संजय देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.