संजय राठोड पुन्हा अडचणीत, पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा भाजप आमदाराचा आरोप

संजय राठोड पुन्हा अडचणीत, पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा भाजप आमदाराचा आरोप

Sanjay Rathod : महायुती (Mahayuti) सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, असा गंभीर आरोप केला.

नगरकरांनो सावधान! 22 ते 25 मे दरम्यान वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन 

विशेष म्हणजे, महायुतीचाच भाग असलेल्या भाजपच्या आमदाराने हा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याबाबतचं पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे

मृद आणि जलसंधारण विभागात पैसे घेऊन नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर संदीप जोशी यांनी माध्यामांशी संवाद साधला. आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचा आरोपही जोशी यांनी केला आहे. ते म्हणाले, मृद आणि जलसंधारण विभागात आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्त्या करताना आर्थिक व्यवहार झाला असून संपूर्ण व्यवहार ‘१०० टक्के’ पैशात झाला आहे. हे खूप दुर्दैवी आहे. यामुळं ३७५ उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे, असंही ते म्हणाले.

पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा 

जेव्हा शासकीय निर्णय स्पष्ट असतात, तेव्हा कुठलातरी मार्ग काढून स्वत:च्या बदल्या करून घेण्याचं काम अधिकारी करतात, हे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे, असंही जोशी यांनी म्हटलं. तसंच याविरुद्ध कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पैसे घेऊन नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप जोशींनी केल्यानं विदर्भासह महाराष्ट्राचंही राजकारण तापलं आहे.

दरम्यान, या अंतर्गत संघर्षामुळे महायुती सरकारची गोची होण्याची शक्यता असून जोशींनी केलेल्या आरोपावर आता मंत्री संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात  हेच पाहणं महत्वाचं आहे.

यापूर्वी द्यावा लागला  राजीनामा…
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अखेर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय पूजा चव्हाणच्या मृत्यूमध्ये संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला होता. पण नंतर पुणे पोलिसांनी त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube