नाला रुंदीकरणाचा प्रश्न अन् अचानक दादा कोंडकेंचा उल्लेख; राठोड अन् मुनगंटीवारांमध्ये काय घडलं?

Sudhir Mungantiwar vs Sanjay Rathod Monsoon Session 2025 : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात ( Monsoon Session 2025) शहरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या प्रश्नावरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या चर्चेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार राजू राठोड यांच्यात विचारांची तुफान देवाण-घेवाण झाली. शहराच्या मुख्य भागातून वाहणाऱ्या महत्त्वाच्या नाल्याच्या रूंदीकरणावर प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. यावर मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सांगितलं की, “हा नाला किती रूंद आहे, याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाईल. जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल.”
मुनगंटीवारांचं “दादा कोंडके” स्टाईल उत्तर
राजू राठोड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट भाषेत टीका केली. हा नाला जितका होता, तितकाच राहील याची खबरदारी शासन घेईल. नाल्याची नैसर्गिक रूंदी कायम राहिली पाहिजे, ही हमी शासनाने (Maharashtra Politics) द्यावी, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, यासोबतच त्यांनी राठोडांच्या विधानातील संदिग्धतेवर बोट ठेवलं. ही हमी न देता ‘सजेशन फॉर अॅक्शन’ म्हणणं म्हणजे काय? हे तर द्विअर्थी झालं. हे काय दादा कोंडकेंचं उत्तर आहे का? असंही मुनगंटीवार यांनी विचारलं.
📍विधानसभा | 2 जुलै 2025
चंद्रपुरातील संरक्षक भिंतीप्रकरणी दोषी अभियंत्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न आज विधानसभेमध्ये उपस्थित केला.#MonsoonSession #Maharashtra #SMUpdate #Vidhansabha #Mumbai #SudhirMungantiwar pic.twitter.com/bt35UsK9GS
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) July 2, 2025
Video : “शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू नका, गोंधळ घालू नका”, अजितदादांनी विरोधकांना खडसावलं
यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सपाट टीका करत विचारलं की, मुळात हा प्रश्न का निर्माण झाला? या नाल्याची जी संरक्षण भिंत आहे. ती लोकवस्ती असलेल्या बाजूला न बांधता श्रीमंतांची केवळ दोन घरं असलेल्या बाजूला बांधण्यात आली, हे चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं. तिथे एका गटाची जागा आहे, तेवढ्याच भागात भिंत बांधण्यात आली. एका व्यक्तीच्या जागेला संरक्षण देण्यासाठी तब्बल 98 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. लोकवस्तीचा विचार न करता विशेष व्यक्तीचा विचार करून हे बांधकाम करण्यात आलं, हे स्पष्ट आहे.
कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा! दशावतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सरकारकडे थेट चौकशीची मागणी
संपूर्ण प्रकरणावरून सरकारने आता भिंत बांधकामाचे निकष, खर्च आणि लाभार्थी यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर यावर बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, मुळात हा प्रश्न का निर्माण झाला? या नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली, ती लोकवस्ती असलेल्या बाजूला बांधायला पाहिजे की विरूद्ध बाजूला बांधायला पाहिजे. फोटो घ्या, माहिती मागा आणि मग उत्तर द्या. संरक्षण भिंत असलेल्या बाजूला श्रीमंतांची केवळ दोन घरं आहेत. त्यांच्या फायद्यासाठी भिंत बांधली गेल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
तिथे एका गटाची जागा आहे, तेवढीच भिंत बांधली. ते बांधकाम पूर्णत: चुकीचं झालेलं आहे. एका व्यक्तीच्या जागेला संरक्षण देण्यासाठी 98 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. याठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्तीचा नाही, तर एका विशेष व्यक्तींचा विचार झाल्याचा आरोप कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.