ठाकरे गटाचे मिशन लोकसभा : 10 शिलेदार मैदानात; संजय राऊतांवर सर्वात मोठी जबाबदारी

ठाकरे गटाचे मिशन लोकसभा : 10 शिलेदार मैदानात; संजय राऊतांवर सर्वात मोठी जबाबदारी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 10 शिलेदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह 10 नेत्यांवर विभागवार बांधणीची आणि लोकसभा (Loksabha) मतदारसंघात शिवसेनेच्या विजयासाठीची जबाबदारी देण्यात आली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) group has given the responsibility of 42 constituencies to 10 Leaders)

यात खासदार संजय राऊत यांच्याकडे सर्वाधिक 12 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर अन्य नऊ नेत्यांकडे उर्वरित महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची धुरा देण्यात आली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ मात्र कोणत्याच नेत्याकडे देण्यात आले नाहीत.

याशिवाय आगामी निवडणुकांची तयारी व महाराष्ट्रासह दिल्लीत ‘बदल’ घडविण्याची तयारी म्हणून जानेवारीत राज्यव्यापी शिबिर, जाहीर सभा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती दौऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. याबाबत लकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Maratha Rerervation : शिंदे समितीत काहीतरी गडबड; नाना पेटोलेंचा भुजबळांच्या सुरात सूर

खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे :

लोकसभा मतदारसंघ : नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)

अनंत गीते, कोकण (रायगड) :

लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा पनवेल, कर्जत, उरण )

चंद्रकांत खैरे, मराठवाडा :

लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना

खासदार अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ :

लोकसभा मतदारसंघ : बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा

खासदार अनिल देसाई, पश्चिम महाराष्ट्र :

सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी

मराठी पाट्यांसाठी कोर्टाची मुदत संपताच ‘मनसे’ मैदानात; मुंबई-ठाण्यात दुकान, शोरुम लक्ष्य

आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भ :

लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर

खासदार विनायक राऊत, कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) :

लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी, सिंधुदुर्ग

खासदार राजन विचारे, कोकण (ठाणे, पालघर) :

लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर

आमदार रवींद्र वायकर, मराठवाडा :

लोकसभा मतदारसंघ : नांदेड, हिंगोली, परभणी

आमदार सुनील प्रभू, मराठवाडा, सोलापूर :

लोकसभा मतदारसंघ : सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube