Maratha Rerervation : शिंदे समितीत काहीतरी गडबड; नाना पेटोलेंचा भुजबळांच्या सुरात सूर

  • Written By: Published:
Maratha Rerervation : शिंदे समितीत काहीतरी गडबड; नाना पेटोलेंचा भुजबळांच्या सुरात सूर

Nana Patole On Shinde Committee मुंबईः आरक्षणावरून (Maratha Rerervation) मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात पेटला आहे. आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती शिंदेवर आक्षेप घेतला आहे. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उडी घेत भुजबळांच्या विधानाला समर्थन दर्शविले आहे. सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्रीच या समितीवर जाहीरपणे आक्षेप घेतायत. म्हणजे यात काहीतरी गडबड आहे असे दिसते. मुळात न्यायमूर्ती निरगुडे समिती असताना दुसरी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमण्याची गरज काय होती? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.

‘सरकार पडणार म्हणणारे ज्योतिष थकले पण..,’; CM शिंदेंनी ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं

नाना पटोले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रश्नी नेमलेल्या गायकडवाड समितीचा अहवाल फेटाळला आहे. तिघाडी सरकारने आरक्षणाचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला सोपा वाटतो काय? सरकार जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी वादाला खतपाणी घालत आहे, असा आरोपही पटोले यांनी केलाय.

ओबीसी-मराठावाद पुढच्या पिढ्यांसाठीही घातक ठरणारा आहे. भाजपा सरकारने आरक्षणप्रश्नी स्पष्ट व ठोस भूमिका घ्यावी तसेच जातनिहाय जनगणना घेतली पाहिजे. बिहार, छत्तीसगड सरकार जातनिहाय जनगणना करते तर महाराष्ट्र सरकार का करत नाही? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

याला म्हणतात ग्रोथ! 8 वर्षात हार्दिक पांड्यांचे पॅकेज 10 लाखांवरुन 15 कोटींवर

जाहिरातीसाठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत का ? नाना पटोलेंचा सवाल
आस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आलीय. मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पाहात आहे. केंद्र सरकारकडे अडीच हजार कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत पण जाहिरातबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का? शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारला परवडणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

हे सरकार शेतकरीविरोधी, निर्ढावलेले सरकार आहे, या सरकारला अधिवेशनात जाब विचारून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काँग्रेस पाठपुरावा करेल. शेतकऱ्यांनी मात्र कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube