Chhagan Bhujabl : मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही; रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांवर भुजबळांचं प्रत्युत्तर

Chhagan Bhujabl : मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही; रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांवर भुजबळांचं प्रत्युत्तर

Chhagan Bhujabl : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujabl) हे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत म्हणून चर्चेत आहेत. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगेंना कडाडून विरोध करत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्यावर आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही हे सर्वांना माहिती आहे. शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शिंदे कोणीही मला स्क्रिप्ट देऊ शकत नाहीत. मी 35 वर्षांपासून ओबीसींसाठी काम करतो. त्यात मला शाहु, फुले, आंबेडकर यांचं जे स्क्रिप्ट आहे. बहुजणांचं जे स्क्रिप्ट आहे. तेच माझं स्क्रिप्ट आहे. असं उत्तर भुजबळांनी दिलं आहे.

Emmy Awards: आंतरराष्ट्रीय पातळीवर जिम सरभने रोवला भारताचा झेंडा; एमी पुरस्कारावर कोरलं नाव

तसेच त्यांनी यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये पडलेल्या फुटीवर देखील प्रतिक्रिया दिली. मी एकटा पडलेलो नाही. राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. काही जण म्हणाले भुजबळ यांच्या स्टेजवर जाणार नाही. काही हरकत नाही. माझ्या स्टेजवर येऊ नका स्वतंत्र बैठक घ्या.

येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड पळाला; ललित पाटील प्रकरणी तोंड पोळलेल्या पोलिसांची पुन्हा नाचक्की

पुढे ते असंही म्हणाले की, तुमची आणि माझी भूमिका एकच आहे ना, ओबीसी आरक्षणचा बचाव करणे नाहीतर मी कुठे राज्यभर जाऊ शकणार आहे. तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा. काही नेते माझ्या सोबत येतील काही जातील. हे चालूच राहणार आहे. काही पक्षाच्या असू शकतात काही लोकांच्या अडचणी असू शकतात, मला त्या बद्दल काही रोष नाही, या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत मोकळे केले. कुठे ही जा ओबीसीसाठी लढा माझ्या विरोधात बोलले तरी चालले. पण ओबीसीच्या बाजूने बोला.

काय म्हणाले रोहित पवार?

दरम्यान सध्या भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते त्यामुळे ते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यावर आता भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube