Chhagan Bhujbal : ‘ओबीसींना बाहेर ढकलण्याचा डाव’; छगन भुजबळांचा गंभीर आरोप

Chhagan Bhujbal : ‘ओबीसींना बाहेर ढकलण्याचा डाव’; छगन भुजबळांचा गंभीर आरोप

Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असतानाच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांवी आपल्याच सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. चुकीच्या मार्गाने ओबीसीत घुसायचे आणि दुसऱ्या मार्गाने जे ओबीसीत आहेत त्यांना कोर्टाच्या माध्यमातून बाहेर ढकलण्याचे प्रयत्न करायचे असा सगळा प्रकार सध्या सुरू आहे, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हेच आमचं म्हणणं आहे. बाळासाहेब सराटे यांनी 2018 मध्ये न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यात त्यांनी असं म्हटलं होतं की ओबीसीतील ज्या 374 जाती आहेत त्यांचं सर्वेक्षण करावं आणि जे चुकीच्या पद्धतीने ओबीसीत समाविष्ट केले गेले आहेत त्यांना यातून काढून टाकावं. मध्यंतरीच्या काळात ते शांत होते. परंतु, आता त्यांनी ही केस लढायची असं सांगितलं. सध्या 35 क्रमांकावर ती केस आहे. त्यामुळे सुनावणीला उशीर होईल, असे भुजबळ म्हणाले.

आता सध्याच्या परिस्थितीत जे सुरू आहे की कुणबी प्रमाणपत्र घ्या आणि ओबीसीत सहभागी व्हा. आधी हेच लोक म्हणत होते की मराठवाड्यात निजामशाहीच्या काळात जे पुरावे आहेत ते पाहा. आम्हीही म्हटलं चला ठीक आहे. आता ती गोष्ट मागं पडली. आता तर राज्यभरात कार्यालयं उघडली गेली आहेत. तेथे कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल आणि ते आपोआप ओबीसीत सामील होतील. अशा पद्धतीने या सगळ्या चुकीच्या गोष्टी सध्या सुरू आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

Chagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र देणारे सत्तेतून जातील; भुजबळांच्या विधानाने खळबळ

मराठा आरक्षणाला विरोध नाहीच 

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यांनी वेगळं आरक्षण द्या. मागच्या कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करा. नंतर सर्वोच्च न्यायालयात लढा द्या ही भूमिका सर्वपक्षीय नेत्यांची आहे. मात्र आता त्यांनी ओबीसींमध्येच आरक्षण हवं आहे. आधी सांगितलं पाच हजार पुरावे मिळाले. मग सांगितलं 11 हजार पुरावे मिळाले. राज्यभरात कार्यालयं उघडली गेली आणि कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत. आम्ही जे आरक्षण मिळवलंय ते खूप प्रयासााने मिळवलं आहे. तेच आज संपवण्याचा घाट घातला जात आहे. एका बाजूने ओबीसीत यायचं आणि दुसऱ्या बाजून हायकोर्टातून ओबीसींना बाहेर ढकलायचं असा प्रकार सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube