परभणीत पुन्हा तणाव! दगडफेक प्रकरणी कोठडीत असलेल्या युवकाचा कारागृहातच मृत्यू…

  • Written By: Published:
परभणीत पुन्हा तणाव! दगडफेक प्रकरणी कोठडीत असलेल्या युवकाचा कारागृहातच मृत्यू…

Parbhani News : परभणीतील (Parbhani) दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) (35) असे मृत तरुणाचे नाव असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप (Shahji Umap) पुन्हा परभणीत दाखल झालेत.

पुण्याला तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार, अजितदादा अन् चंद्रकांत पाटलांसह ‘या’ आमदाराचे नाव चर्चेत… 

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. न्यायाधीशांच्या उपस्थितीत या तरुणाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी उशिरा मोठा जमाव पुतळा परिसरात दाखल झाला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) बंद पुकारण्यात आला होता. दुपारपर्यंत हा बंद शांततेत सुरू होता. मात्र दुपारनंतर या बंदला मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी संतप्त जमावाने शहरातील बाजारपेठेत घुसून तोडफोड केली होती. आंदोलकांचा प्रचंड मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, आंदोलकांवर पोलिसांनी केलेला सौम्य लाठीचार्ज, संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा तणावपूर्ण घटनांनंतर पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यक्तीचा तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

‘….त्यामुळे आमचा सीएम, शिंदेंनी नाराज असण्याचं कारणच नाही; अमित शाह स्पष्टच बोलले 

प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ सूर्यवंशी असे ३५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारागृहातच या तरुणाच्या मृत्यूने शहरात खळबळ उडाली आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्फ्यूची आवश्यकता नाही
दरम्यान, बंददरम्यान तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही समोर आल्यानंतर आतापर्यंत एकूण 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 41 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. या संदर्भात पोलीस महानिरीक्षक शाहजी उमाप म्हणाले की, या घटनेला जबाबदार असलेल्या 50 जणांना ताब्यात घेण्यात आले असून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी कर्फ्यूची आवश्यकता नाही,असं उमाप यांनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube