‘….त्यामुळे आमचा सीएम, शिंदेंनी नाराज असण्याचं कारणच नाही; अमित शाह स्पष्टच बोलले

  • Written By: Published:
‘….त्यामुळे आमचा सीएम, शिंदेंनी नाराज असण्याचं कारणच नाही; अमित शाह स्पष्टच बोलले

Amit Shah : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाष्य केलं.

नितेश राणे, पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन, भाजपकडून आणखी कोण घेणार शपथ? अन् कुणाचा पत्ता कट? 

एकनाथ शिंदे नाराज असण्याचं काहीच कारण नाही, निवडणुकीत आमच्या जास्त जागा निवडणून आल्यानं आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री बनवले, असे शाह म्हणाले.

अमित शहा यांनी यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनाली मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याचं बोललं जातंय, याविषयी विचारले असता शाह म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी नाराज होण्याचे काहीच कारण नाही. कारण, आमच्या जागा खूप जास्त निवडणून आल्यात. गेल्या वेळीही आमच्याकडे जास्त जागा होत्या. मात्र आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांच्या पाठीशी अडीच वर्षे खंबीरपणे उभे राहिलो. यावेळी मात्र आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो होतो की, मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतरच ठरवले जाणार. त्यामुळे कोणी नाराज असण्याची गरज नाही, कोणी नाराजही नाही, असं शाह म्हणाले.

भारताला मिळणार 12 सुपर सुखोई, 13500 कोटींची डील फायनल, पाकिस्तान- चीनला चोख प्रत्युत्तर ! 

उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फारच कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, विधासभा निवडणुकीत महायुतीने मविआचं पानीपत केलं. हा बदल कसा शक्य झाला? याविषयी विचारलं असता शाह म्हणाले की, गेल्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळाले होते. शिवसेनेने ज्या जागांवर निवडणूक लढवली होती, त्या जागांवर आम्ही लढलो नव्हतो, त्यामुळे आम्ही त्या जिंकू शकलो नाही. शिवसेना आमच्यासोबत होती त्यामुळे त्यांना बहुमत मिळाले आणि आम्हाला पूर्ण संपूर्ण बहुमत मिळालं होतं. मात्र, मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला, असंही ते म्हणाले.

विकासकामांच्या जोरावर आमचा विजय…
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आमचा विश्वासघात केला, जनतेने ते लक्षात ठेवलं. त्यानंतर अडीच वर्षात सरकारने विकासाचे जी काम केली, मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील सकारात्मक कामे यांच्या जोरावर हा प्रचंड विजय मिळाला आहे.

राज्यात 5 डिसेंबरला सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झालं तरी अद्याप दहा दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तरावरून तिढा आहे का, असा सवाल केला असता शाह म्हणाले की, आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात जराही अडचण येत नाहीये, सर्वकाही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सुरू आहे, असं शाह म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube