भारताला मिळणार 12 सुपर सुखोई, 13500 कोटींची डील फायनल, पाकिस्तान- चीनला चोख प्रत्युत्तर !

  • Written By: Published:
भारताला मिळणार 12 सुपर सुखोई, 13500 कोटींची डील फायनल, पाकिस्तान- चीनला चोख प्रत्युत्तर !

Indian Air Force : गेल्या अनेक दिवसांपासून चीन (China) आणि पाकिस्तान यांच्यासोबत सुरु असणाऱ्या वादामुळे भारतीय हवाई दलाने 12 सुखोई विमानांचा करार केला आहे. माहितीनुसार, सरकारच्या सुरक्षा विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने हवाई दलासाठी 12 सुखोई-30 लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.  या विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 13500 कोटी रुपयांचा करारही करण्यात आला आहे.

सुखोई-30 काय असेल खासियत?

सुखोई-30 (Sukhoi-30MKI) स्वदेशी तंत्रज्ञानाने प्रगत असणार आहे. यामध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान, एईएसए रडार, मिशन कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, कॉकपिट लेआउट आणि शस्त्रास्त्र सिस्टिम असणार आहे. तसेच नव्याने अपग्रेड केलेले सुखोई-30 अधिक प्रगत ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले ॲरे (AESA) रडारसह बसवले जाईल. हे शत्रूला खूप दूरवरून शोधून काढण्यास मदत करते. माहितीनुसार, नवीन सुखोई विमानावर एक नवीन इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट लावण्यात येणार आहे. जो शत्रूच्या रडारखाली येण्यापासून संरक्षण करेल. याच बरोबर यात सेल्फ प्रोटेक्शन जॅमर असतील तसेच चॅफ आणि फ्लेअर्स डिस्पेंसर असतील ज्यामुळे सुखोई फायटर आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला आणि विमानाला वाचवू शकेल. ही जेट विमाने एचएएलच्या नाशिक कारखान्यात तयार होणार असून त्यात स्वदेशीकरणाचा वाटा 62.6 टक्के असेल. यापूर्वी या कारखान्यात रशियाच्या परवान्यानुसार प्रथम मिग आणि नंतर सुखोई-30 लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आली आहे.

1990 च्या दशकात रशियाकडून भारताने सुखोई विमान घेतले होते. त्यानंतर भारताने 272 सुखोई-30 विमानांचा करार केला होता. यातील काही विमानांची निर्मिती रशियात करण्यात आली होती आणि उर्वरित विमानांची निर्मिती HAL ने भारतात केली होती.

हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु, ‘या’ विषयांवर होणार चर्चा, ‘मविआ’ देणार का महायुतीला आव्हान ?

सध्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई- 30 या लढाऊ विमानांची संख्या सर्वाधिक आहे. या विमानात दोन सीट आणि दोन इंजिन आहेत. मॅच 2 च्या वेगाने उड्डाण करणारे हे लढाऊ विमान एकावेळी 3000 किमी अंतर कापू शकते. हे ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे. 8000 किलोपर्यंतची शस्त्रे स्वत:सोबत वाहून नेण्यास सक्षम आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube