‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा भारतात, चीनचा 1-0 ने उडवला धुव्वा

  • Written By: Published:
‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा भारतात, चीनचा 1-0 ने उडवला धुव्वा

Asian Champions Trophy :  भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Womens Hockey Team) शानदार कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Champions Trophy) जिंकली आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव केला आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. त्यामुळे सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

तर भारतीय संघाने तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोल करत या सामन्यात आघाडी घेतली. दीपिकने 31व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली आणि हीच आघाडी सामन्यात निर्णायक ठरली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी रांचीमध्ये देखील शानदार कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

या सामन्याच्या 31 व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. तर दुसरीकडे तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला आघाडी दुप्पट करण्याची संधी होती मात्र भारताला यश आले नाही. 42व्या मिनिटाला दीपिकाला पेनल्टीचा रूपांतर गोलमध्ये करता आले नाही.

Maharashtra Election 2024 : सोलापुरात अनेकांना धक्का? 2019 च्या तुलनेत मतदान वाढले..

तर या सामनाच्या शेवटच्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये देखील भारतीय संघाने गोल करण्याची संधी गमावली. या सामन्यात भारतीय संघाने चार पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली मात्र शेवटी भारतीय संघाने अंतिम सामना 1-0 ने जिंकून सलग दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तर या स्पर्धेत जपान तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि मलेशिया चौथ्या क्रमांकावर राहिला.

Jharkhand Election Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचा काँग्रेसला धक्का, झारखंडमध्ये भाजप सरकार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube