भारताची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये धडक, दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव
India vs Korea Semifinal : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये भारताने (Team India) धडक मारली आहे. उपांत्य फेरीत शानदार कामगिरी करत भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये भारताचा सामना यजमान चीनशी (China) होणार आहे. चीनने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
मंगळवारी भारत आणि चीन यांच्यात अंतिम सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) पुन्हा शानदार कामगिरी करत दोन गोल केले तर उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंगने प्रत्येकी एक गोल केला आणि दक्षिण कोरियाकडून या सामन्यात गोल जिहुन यांगने गोल केला.
या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये उत्तम सिंगने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली तर यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये दुसरा गोल करत दक्षिण कोरियावर 2-0 अशी आघाडी घेतली आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियासाठी जिहुन यांगने गोल केला मात्र त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत पुन्हा एकदा भारतीय संघाला आघाडी मिळून दिली.
Full Time:
We are into the finals.
Another smashing win at the Men’s Asian Champions Trophy, 2024 for Team India.Goals from Harmanpreet, Jarmanpreet and Uttam Singh give India the win.
India 🇮🇳 4 – 1 🇰🇷 Korea
Uttam Singh 13′
Harmanpreet Singh 19′ (PC)
Jarmanpreet Singh…— Hockey India (@TheHockeyIndia) September 16, 2024
‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारताचा हा सलग सहावा विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने पूल स्टेजमध्ये आपले सर्व पाचही सामने जिंकले आहे आणि या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ एकमेव संघ आहे. भारताने पाकिस्तानचा 2-1, कोरियाचा 3-1, मलेशियाचा 8-1, चीनचा 3-0 आणि जपानचा 5-0 असा पराभव केला आहे.
सुजय विखे वाढवणार थोरातांचं टेन्शन? विधानसभेसाठी संगमनेरमधून ठोकला दावा