Maharashtra Election 2024 : सोलापुरात अनेकांना धक्का? 2019 च्या तुलनेत मतदान वाढले..

  • Written By: Published:
Maharashtra Election 2024 :  सोलापुरात अनेकांना धक्का? 2019 च्या तुलनेत मतदान वाढले..

Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Election 2024) आज मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे अनेक एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार येणार असल्याचा अदांज वर्तवण्यात येत आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे यावेळी अनेक जिल्ह्यांमध्ये यावेळी मतदानाचा टक्का वाढला असल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. 2019 च्या विधानसभा तुलनेत 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यात देखील यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरी 65.41 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या यंदा एका टक्का मतदान वाढला आहे. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 64. 59 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला मतदान कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

माहितीनुसार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सांगोला मतदारसंघात सर्वाधिक मतदान 73.59 टक्के तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सर्वांत कमी 53.56 टक्के मतदान झाले आहे. मात्र या आकडेवारीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात 38 लाख 48 हजार 869 मतदार होते त्यापैकी 25 लाख 17 हजार 374 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 13 लाख 17 हजार 364 पुरुष मतदार, तर 11 लाख 99 हजार 912 महिला मतदारांचा समावेश आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात 64.33 टक्के तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 58.35 टक्के तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात 56.62 टक्के तर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 53.36 टक्के तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात 68.62 टक्के मतदान तर माढा विधानसभा मतदारसंघात 70.36 टक्के मतदान झाले आहे.

Jharkhand Election Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचा काँग्रेसला धक्का, झारखंडमध्ये भाजप सरकार

तर करमाळामध्ये 68.85 टक्के, पंढरपूरमध्ये 68.97 टक्के, बार्शीमध्ये 72.52 टक्के, माळशिरसमध्ये 65.69 टक्के आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात 73.59 टक्के मतदान झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube