1996 मध्ये दुरदर्शनकडून सुरूवात! कोणते प्रश्न ठरवतात अंदाज किती खरे किती खोटे एक्झिट पोल?

exit poll एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलची सुरुवात कशी झाली? यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते कितपत खरं ठरतात जाणून घेऊ सविस्तर...

Exit Poll

Starting with Doordarshan in 1996 What questions determine how accurate and how false exit poll predictions are : देशामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन मोठ्या राज्यांसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मतदान आज 29 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होईल. त्यानंतर सर्वांच्या नजरा असतील त्या एक्झिट पोलवर. म्हणजे निवडणुकांच्या निकालांपूर्वी मांडलेले अंदाज. यातून लोकांना काहीसा दिलासा मिळतो तर अनेकांची बेचैनी वाढते की, कोणता पक्ष आणि कोणते उमेदवार निवडून येतील? एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलची सुरुवात कशी झाली? यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते कितपत खरं ठरतात जाणून घेऊ सविस्तर…

एक्झिट पोल म्हणजे काय?

एक्झिट पोल म्हणजे काय? हा निवडणुकानंतर केला जाणारा सर्वे आहे जो निवडणुकांच्या निकालाप्रमाणे सादर केला जातो. नावाप्रमाणेच एक्झिट पोल म्हणजे पोलिंग बूथ वरून वोटर्स शी संवाद साधून तयार करण्यात आलेले अंदाज असतात. हा एक प्रकारचा निवडणुकांचा सर्व्हे असतो. मतदानाच्या दिवशी जेव्हा मतदार मत देऊन मतदान केंद्रातून बाहेर येतात. त्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले जातात. त्यातून काही अंदाज मांडले जातात. यासाठी हजारो मतदारांच्या मतदानानंतर अनेक संस्था विश्लेषण करतात. ज्यामध्ये विविध अंदाज लावले जातात. जसे की कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. हे प्रामुख्याने सांगितलं जातं.

एक्झिट पोल ची सुरुवात कशी झाली?

एक्झिट पोलची सुरुवात अमेरिकेत झाली. 1930 आणि 40 च्या दशकात जॉर्ज गॅलक आणि क्लाऊड रॉबिन्सन यांनी अमेरिकन सरकारच्या कामकाजावर लोकांचे मत विचारून एक सर्व्हे केला होता. त्यानंतर ब्रिटन, फ्रान्स, जर्मन आणि डेन्मार्कमध्ये देखील अशा प्रकारे सर्वे करण्यात आला. तर टाईम मॅक्झिननुसार 1967 मध्ये पहिल्यांदा जगात मोठ्या स्तरावर एक्झिट पोल केला गेला.

आमदारकी, खासदारकी 100 वेळा कुर्बान; दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी, अंधारेंची प्रतिक्रिया चर्चेत

तर भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे तत्कालीन प्रमुख एरिक डी कोस्टा यांनी 1980 च्या दशकामध्ये भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर एक्झिट पोलवर काम केलं. यामध्ये त्यांच्यासोबत पॉलिटिकल एक्सपर्ट प्रणय रॉय आणि युकेचे पॉलिटिकल एक्सपर्ट डेविड बटलर हे होते. त्यांच्या या विश्लेषणाला अशोक लाहिरी यांनी त्यांचे पुस्तक कॉम्पेडियम ऑफ इंडियन एलेक्शनमध्ये जाहीर केलं.

Nilesh Lanke : लंकेची गुगली अन् विखे क्लीन बोल्ड…, तो माझा राजकीय डाव

त्यानंतर 1996 मध्ये सरकारी दूरदर्शन चॅनलने सीएसडीएस सोबत मिळून पहिल्यांदा एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपाला 190 ते 200 जागा तर काँग्रेसला 140 ते 50 जागा येतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज काही फार प्रमाणात खरा ठरला होता. ज्यामध्ये भाजपला 161 जागा मिळाल्या आणि त्यांनी सरकार बदललं काँग्रेसला 140 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सर्वच सॅटेलाईट चॅनल्सने एक्झिट पोल जाहीर करणे सुरू केले.

एक्झिट पोलबाबत कायद्यामध्ये काय तरतूद आहे?

एक्झिट पोलची प्रकरणं वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वेळा सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 च्या सेक्शन 126 नुसार मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर करता येतात. जर एखादी कंपनी किंवा व्यक्ती मतदान पूर्ण होण्याच्या अगोदर एक्झिट पोल जाहीर करत असेल तर हा गुन्हा मानला जातो. यासाठी दोन वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

Milind Narvekar : ‘बॉस’ राईट, पण नार्वेकरांचा अंदाज फ्लॉप; ‘त्या’ 1 टक्क्याने नार्वेकरांना धक्का…

1998 मध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोगाने संविधानातील अनुच्छेद 324 नुसार वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्समध्ये एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी आणली होती. त्यावर्षी 16 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये सात मार्चला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी आणली होती. त्याचबरोबर एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या कंपन्यांना सर्व्हेमध्ये त्यांनी घेतलेले मतदार, त्यांची मेथोडोलॉजी हे सांगणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्यामध्ये कोणत्या कमतरता आहे. ते देखील सांगणं बंधनकारक आहे.

भारतामध्ये कोणत्या संस्था एक्झिट पोल करतात कोणते फॅक्टर ग्राह्य धरले जातात?

भारतामध्ये कोणत्याही सरकारी संस्था एक्झिट पोल करत नाही. मात्र 15 खाजगी संस्था आणि माध्यम कंपन्या एकत्र येऊन एक्झिट पोल जाहीर करतात. यामध्ये चाणक्य, सीओटर, माय ॲक्सिस, जन की बात, नेल्सन यांचा समावेश आहे. तर एक्झिट पोलसाठी तीन मुख्य घटक ग्राह्य धरले जातात.

सॅम्पल साइज – ज्या एक्झिट पोलचा सॅम्पल साईज जितका मोठा आहे. त्याला तेवढं जास्त तंतोतंत खरं मानलं जातं म्हणजे किती लोकांचा सर्वे झाला आहे हे महत्त्वाचं आहे

सर्व्हेतील प्रश्न – एक्झिट पोलसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये विचारले गेलेले प्रश्न जितके जास्त न्यूट्रल असतील तितका एक्झिट पोल हा योग्य येतो.

सर्व्हेची रेंज – सर्वच परिक्षेत्र जितकं मोठं तितका अंदाज योग्य येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ विधानसभेसाठी दोन-तीन मतदान केंद्र सॅम्पलसाठी घेतले जातात. ज्या ठिकाणी एखाद्या उमेदवाराची मजबूत पकड आहे याचा एक्झिट पोलवर मोठा परिणाम होतो

कोण कोणते प्रश्न विचारले जातात?

एक्झिट पोलमध्ये डायरेक्ट इन डायरेक्ट दोन प्रकारे प्रश्न विचारले जातात. जर लोक थेट उत्तर देत नसतील तर प्रश्न फिरून विचारला जातो. यामध्ये

ज्यामध्ये तुम्ही कुणाला मतदान केलं आणि का?
जात हा फॅक्टर किती यशस्वी होतो आणि का?
एखाद्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने युती किंवा आघाडीवर परिणाम होतो का
नोकरीच्या मुद्द्यावर किंवा बेरोजगारांनी कोणत्या आधारे मतदान केलं?
धर्माच्या आधारावर मतदान केलं का?

follow us