Nilesh Lanke : लंकेची गुगली अन् विखे क्लीन बोल्ड…, तो माझा राजकीय डाव
Nilesh Lanke : 2024 ची लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी प्रतिस्पर्धी सुजय विखे यांना पराभूत करत खासदारकीला गवसने घातली मात्र अवघ्या
Nilesh Lanke : 2024 ची लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी प्रतिस्पर्धी सुजय विखे यांना पराभूत करत खासदारकीला गवसने घातली मात्र अवघ्या दोन वर्षातच आपण 2029 ला विधानसभा लढवणार असं वक्तव्य करून लंके यांनी खळबळ उडून दिली तर महायुतीची इच्छा आहे की, लंके यांनी 2029 ची लोकसभा निवडणूक लढवावी असं म्हणत विखे यांनी लंकेंना देऊ असलं यावरून लंके विखे यांच्यातील शाब्दिक युद्धाला तोंड फुटले व लंके काय भूमिका घेणार यावरून चर्चा रंगू लागल्या मात्र लंके यांची ही शाब्दिक उगलीवर विखे एक क्लीन बोल्ड झाल्याचं पाहायला मिळालं.
2029 ची विधानसभा लढवणार
कोणाची तरी जिरवायची म्हणून आपण लोकसभा (Lok Sabha) लढलो मात्र आता 2029 ला आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी एका सभेदरम्यान वक्तव्य केलं. लंके यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली . लोकसभा निवडणूक होऊन अवघे दोनच वर्षे झाले यामुळे लंके (Nilesh Lanke) यांनी आपण विधानसभा लढवणार या चर्चेने लंके यांची बदलते भूमिकेवरून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
आधी लोकसभा लढवा मग विधानसभा
महायुतीच्या (Mahayuti) पदाधिकाऱ्यांची विनंती आहे की, लंके यांनी 2029 ची लोकसभा निवडणूक लढवावी त्यानंतर त्यांनी विधानसभा लढवावी. कारण आपण जी आश्वासने देऊन निवडून आलात त्याचं मोजमाप हे निवडणुकीपूर्वीच होणार जर आपण विधानसभा लढवणार असले असे म्हणत असाल तर अहिल्यानगरच्या त्या प्रत्येक मतदाराचा अपमान आहे अशा शब्दात सुजय विखेंनी लंकेंवरती निशाणा साधला.
लंकेची गुगली! तो माझा राजकीय डाव
लंके विधानसभा लढवणार की लोकसभा यावरती बोलताना लंके म्हणाले, राजकारणात कोणी अमरपट्टा घेऊन आलेले नसते. माझं ते वक्तव्य म्हणजे एक राजकीय डाव होता. ही माझी एक गुगली होती मात्र काहींनी हे खूप गांभीर्याने घेतल. पुढच्या काळात काय होतं हे आत्ताच सांगता येणार नाही की संधी मिळाली त्याद्वारे काम केलं पाहिजे असं लंके म्हणाले. तसेच सुजय विखे यांच्यावर निशाणास साधताना लंके म्हणाले, मतदार जागृत आहे त्यांना कोणतीही काळजी नाही काही ठराविक लोकांना काळजी आहे. मी काय निर्णय घ्यायचा याबाबत मी थेट मतदारांशी कनेक्ट आहे त्यामुळे इतरांना काळजी करू नये अशा शब्दात लंके यांनी विखेंचा नाव न घेता त्यांना शाब्दिक टोला लागावला.
महाविकास आघाडीत फूट ? विधान परिषदेसाठी काँग्रेसही देणार उमेदवार-
2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सातत्याने विखे व लंके हा संघर्ष राज्यात पाहायला मिळाला आहे. यातच 2029 च्या उमेदवारीवरून आत्तापासूनच विखे व लंके यांच्या शाब्दिक खटके उडू लागले. दरम्यान आगामी लोकसभेला खरंच निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना झाला तर एक वेगळा संघर्ष पाहायला मिळू शकतो.