गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!

Gokul Dudh Sangh President Election: फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, म्हणून सतेज पाटलांनी त्यांच्या गटातील संचालकांना सहलीला पाठवलं.

Satej Patil sends 13 Gokul directors on tour ahead of president election

Satej Patil sends 13 Gokul directors on tour ahead of president election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक 29 ऑक्टोबरला होणार असून, त्याआधी सतेज पाटील यांनी आपल्या गटातील 13 नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठवल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्षपदासाठी फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, म्हणून सतेज पाटलांनी त्यांच्या गटातील संचालकांना सहलीला पाठवलं आहे.

ऑडिओ क्लिपनंतर जरांगेंनी घेतला मोठा निर्णय; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन

गोकुळ दूध संघाच्या एकूण 25 संचालकांपैकी 13 संचालक सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे, तर 12 संचालक महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत दोन्ही गटांसाठी प्रत्येक संचालकाचं मत महत्त्वाचं ठरणार आहे.

अध्यक्ष निवडीसाठी 14 संचालकांचा कोरम आवश्यक

गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी सहकार कायद्यानुसार आवश्यक कोरम पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

सेबीची अवधूत साठेवर कठोर कारवाई; 546 कोटी परत करण्याचे आदेश!

अध्यक्षपदाच्या निवडीआधी आपल्या गटातील संचालक एकत्र राहावेत आणि कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये, यासाठी सतेज पाटील यांनी 13 संचालकांना सहलीवर पाठवलं

29 ऑक्टोबरला काय घडणार?

दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक 29 ऑक्टोबरला होणार आहे. संचालकांच्या संख्याबळामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार आणि निवडीच्या दिवशी कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us