आसाम, केरळम, तामिळनाडू पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालचा एक्झिट पोल काय?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात येतात.

News Photo   2026 04 29T180955.099

आसाम, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे (Election) मतदान प्रक्रिया झालेली आहे. तर पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज संपलं. आता एक्झिट पोल समोर येतील. विविध संस्थांचे त्यांचे कौल जाहीर करतील. या राज्यातील निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी मतमोजणीनंतर समोर येतील. अर्थात त्यापूर्वी आज संध्याकाळी एक्झिट पोल समोर येतील.

निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर; EVMs वर टेप प्रकरणात फेरमतदानाचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात येतात. पाच राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अनेक संस्था एक्झिट पोल जाहीर करतील. अनेकदा एक्झिट पोलचाही अंदाज चुकल्याचे स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलची आकडेवारी जुळली नसल्याचं आणि एक्झिट पोल खोटा ठरल्याचेही समोर आलेलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीसारख्या राज्यात हे अगोदर दिसले आहे.

मत आणि कौल यात काय अंतर?

Opinion Poll हा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी घेतला जातो. यामध्ये मतदानापूर्वी लोकांचा कल काय आहे, याचा अंदाज घेतला जातो. मतदारांचे मत जाणून घेतल्या जाते. तर एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कौल कुणाला हे तपासले जाते. निवडणूक संपल्यानंतर ते जाहीर केल्या जाते. ओपिनियन पोल एक प्री पोल सर्व्हे असतो. निवडणूक घोषणेपूर्वी ते दाखवण्यात येते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि आचार संहिता जाहीर होताच ओपिनियन पोलवर बंदी घातली जाते.

संकेतस्थळ, युट्यूब आणि सोशल मीडियानवर एक्झिट पोल दिसतील. पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पोल समोर येणार आहेत. दरम्यान, अनेक माध्यमांनी त्यामध्ये चॅनलसह युट्यूब, सोशल माध्यम आणि काही राजकीय भाष्यकारांनी ममता पुन्हा विजयी होतील मात्र, जागा कमी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

follow us