पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल
Maharashtra Elections Exit Polls 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच आहे. मात्र या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यात कोणत्या आघाडीा किती जागा मिळू शकतात याचा अंदाज जाणून घेऊ या..
Exit Polls 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय..
पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्याच्या परस्थितीत जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक 10 आमदार आहेत. तर भाजप 8 आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. आता जे एक्झिट पोल आले आहेत त्यानुसार पुणे शहरातील 8 पैकी 4 मतदारसंघात महायुतीला यश मिळेल अशी शक्यता आहे. तर जिल्ह्यातील एकूण 21 जागांपैकी 11 जागा मविआला तर 10 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण जिंकू शकतो
महायुती
शिरुर, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकतील अशी शक्यता आहे.
महाविकास आघाडी
जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील अशी शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा ?
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.
इलेक्टोरल एजनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसत आहे.
लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोल्सने शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात मविआचं पारडं जड! महायुतीला केवळ 17 ते 18 जागा, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी