“गद्दारांना धडा शिकवणार, बेईमानांना माफी नाही”, लंकेंनी फुंकले ‘झेडपी’ निवडणुकीचे रणशिंग

विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल.

Nilesh Lanke

Nilesh Lanke Latest News : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी हंगा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीतील अनुभव, ईव्हीएम वाद, गद्दारीचा मुद्दा आणि महायुती सरकारवर हल्लाबोल अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, शिवाजीराव जाधव, विकास रोहोकले, अशोक रोहोकले, ॲड. राहुल झावरे, सचिन पठारे, बाळासाहेब खिलारी, रवींद्र राजदेव, प्रकाश गाजरे, जितेश सरडे, शिवाजी होळकर, गणेश साठे, अजय लामखडे, बाबासाहेब काळे, पोपटराव पुंड, पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, राजू शेख, योगेश मते, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, भुषण शेलार, सचिन औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, सचिन पठारे, दादा शेटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी निवडणुकीला हाच उमेदवार समोर असावा, सुजय विखेंचा निलेश लंकेंना खोचक टोला

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका (Local Body Elections) आपण ताकदीने लढवणार आहोत आणि जिंकणारही आहोत. आपला विजय निश्चित असला तरी फाजील आत्मविश्वास नको. प्रत्येक मतदारापर्यंत संघटीत पद्धतीने पोहोचा. प्रत्येक बूथ मजबूत करा. कारण मतदार हाच आपला खरा किल्ला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आपलीच ताकद पुरेशी असल्याचे लंके (Nilesh Lanke) म्हणाले.

या छोट्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मॅनेज होणार नाही. परंतु मोठ्या निवडणुकीत आपण कसा निसटता पराभव पाहिला हे राज्यभर चर्चेत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर गेला. यावरून ईव्हीएम घोटाळयाची गंभीरता लक्षात येते. पण या निवडणुकीत मतपेटीला हात लावता येणार नाही. त्यामुळे आपल्या मेहनतीचा थेट फायदा आपल्यालाच मिळेल असे ते ठामपणे म्हणाले.

गद्दारांना धडा शिकवणार 

खा. लंके यांनी गद्दारांविषयी कठोर शब्दांत हल्लाबोल केला. विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल. महाविकास आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण मी बेईमानांना कधीही माफ करणार नाही अशी रोखठोक भूमिका लंके यांनी मांडली. काही जण मध्यस्थी घालून चुकलं, माफ करा असा निरोप पाठवत आहेत. पण निष्ठा ही एकदाच सिद्ध करायची गोष्ट असते. माझा स्वाभिमानी कार्यकर्ता दुसऱ्याच्या दारात कधीही गेला नाही. निलेश लंके प्रतिष्ठानचा परिवार सर्व आव्हानांना तोंड देऊ शकतो, म्हणून आम्हाला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही असेही खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.

“हा तर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव”, मनपा प्रभाग रचनेवर खा. लंकेंनी घेतली हरकत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube