राज्यात महापालिकेचं बिगुल वाजलं; तब्बल साडेतीन कोटी मतदार

महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; 15 जानेवारीला 2026 राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार असून निकाल 16 जानेवारीला होणार जाहीर.

  • Written By: Published:
Untitled Design (111)

Election program of 29 municipalities across the state announced : राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक(Managarpalika Election) होणार असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. त्याचप्रमाणे मतदान(Election) संपण्याच्या 48 तास आधी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली असून आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रमाची आकडेवारी खालीलप्रमाणे

एकूण महापालिका – 29
एकूण मतदार केंद्रे – 39 हजार 147
एकूण मतदार – 3 कोटी 47 लाख
महिला मतदार – 1 कोटी 66 लाख 79 हजार 755
पुरुष मतदार – 1 कोटी 81 लाख 93 हजार 666
इतर मतदार – 4 हजार 590

राज्यातील आकडे वारी

कंट्रोल युनिट – 43 हजार 958
बॅलेट युनिट – 87 हजार 916

मुंबईतील आकडेवारी

मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्रे
कंट्रोल युनिट 11 हजार 349
बॅलेट 22 हजार 698

उमेदवार आणि जागा

2 हजार 879 जागांसाठी निवडणूक
अनुसूचित जाती – 341
अनुसूचित जमाती – 77
उमेदवार महिला – 1 हजार 442
नागरिकांचा मागास प्रवर्ग – 759

प्रशासकीय यंत्रणा

निवडणूक अधिकारी – 290
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी – 870
इतर कर्मचारी – 1 लाख 96 हजार 605

follow us