Jharkhand Election Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचा काँग्रेसला धक्का, झारखंडमध्ये भाजप सरकार

  • Written By: Published:
Jharkhand Election Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचा काँग्रेसला धक्का, झारखंडमध्ये भाजप सरकार

Jharkhand Election Exit Poll Result 2024 :  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.  23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी झारखंड विधानसभासाठी काही एक्झिट पोल (Jharkhand Election Exit Poll Result 2024 ) समोर आले आहे.

झारखंडमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील 38 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे तर 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 43 जागांवर मतदान झाले होते. झारखंडच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. झारखंडच्या एक्झिट पोलमध्ये NDA सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मॅट्रिज एक्झिट पोलनुसार,  झारखंडमध्ये भाजप आघाडीचे सरकार बनू शकते, झारखंडमध्ये एनडीएला 42-47 जागा, काँग्रेस आघाडीला 25-30 जागा मिळू शकतात. तर  JVC एक्झिट पोलमध्ये एनडीएला 40-44 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला 30-40 जागा मिळू शकतात.

तर पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये एनडीएला 44-53 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला 25-37 जागा मिळू शकतात. तर लोकपोल एक्झिट पोलनुसार  भाजप आघाडीला 36-39 जागा मिळतील आणि भारताला 41-44 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून सात पोलीस निलंबित; नेमकं कारण काय?

तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील पुन्हा एकदा महायुतीची सरकार येणार असल्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे. पोल डायरीनुसार राज्यात महायुतीला 122-176 तर मविआला 69-121 आणि इतरला 12-19 जागा मिळण्याची शक्याता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube