live now
Maharashtra Assembly Election 2024 : एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने, 23 नोव्हेंबर रोजी निकाल
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : गेले महिनाभर मोठ्या उत्साहात प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज बुधवार (दि. 20 नोव्हेंबर)रोजी होत असून, त्यात 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 9 कोटी 70 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आव्हानही निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. या सर्व घडामोडींवर लेट्सअप मराठीची नजर असून आपल्याला या पेजवर सर्व अपडेट्स मिळणार आहेत. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात काय घडत आहे किंवा कुठ किती मतदान होतय या सर्व घडामोडींसाठी कायम लेट्सअप मराठीशी जोडलेले राहा.
LIVE NEWS & UPDATES
-
Jharkhand Election Exit Poll Result 2024 : झारखंडमध्ये एक्झिट पोलने भाजप सरकारचा अंदाज वर्तवला
मॅट्रिज एक्झिट पोल
एनडीए 42-47 जागा
काँग्रेस आघाडीला 25-30 जागा
JVC एक्झिट पोल
एनडीए 40-44 जागा
काँग्रेस आघाडी 30-40 जागा
-
Maharashtra Exit Polls 2024 : एक्झिट पोलनुसार महायुतीला पुन्हा सत्ता
इलेकोट्ल एज : महायुती - 121, मविआ- 150, अपक्ष - 20
पोल डायरी : 122-176, मविआ - 69-121, इतर 12-19
चाणक्य स्ट्रॅटजीस : महायुती -152-160, मविआ - 130-138, इतर- 6-8
मॅट्रिझ : महायुती 150-170, मविआ -110-130, अन्य 8-10
पीपल्स पल्स : महायुती 175-195, मविआ-85-12, अपक्ष-7-12
-
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात पुन्हा महायुतीची सरकार
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी पोल डायरी आणि चाणक्य एक्झिटचा पोल समोर आला आहे. या पोलनुसार राज्यात महायुतीची सरकार येणार आहे.
पोल डायरी एक्झिट पोल
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
चाणक्य एक्झिट पोल
महायुती 152 ते 160 जागा
भाजप-90
शिंदे गट- 48
अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागा
काँग्रेस-63
ठाकरे गट-35
शरद पवार गट-40
इतर- 6 ते 8
-
इलेक्ट्रोल एजच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला बहुमत
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी इलेक्ट्रोल एजच्या एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची सरकार येणार आहे.
महायुती
भाजप -78
शिवसेना - 26
राष्ट्रवादी काँग्रेस- 14
मविआ
काँग्रेस - 60
शिवसेना (ठाकरे गट) - 44
राष्ट्रवादी (काँग्रेस शरद पवार गट)- 46
अपक्ष 17
-
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
अहमदनगर - ६१.९५ टक्के
अकोला - ५६.१६ टक्के
अमरावती -५८.४८ टक्के
औरंगाबाद- ६०.८३ टक्के
बीड - ६०.६२ टक्के
भंडारा- ६५.८८ टक्के
बुलढाणा-६२.८४ टक्के
चंद्रपूर- ६४.४८ टक्के
धुळे - ५९.७५ टक्के
गडचिरोली-६९.६३ टक्के
गोंदिया -६५.०९ टक्के
हिंगोली - ६१.१८ टक्के
जळगाव - ५४.६९ टक्के
जालना- ६४.१७ टक्के
कोल्हापूर- ६७.९७ टक्के
लातूर -६१.४३ टक्के
मुंबई शहर- ४९.०७ टक्के
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के
नागपूर - ५६.०६ टक्के
नांदेड - ५५.८८ टक्के
नंदुरबार- ६३.७२ टक्के
नाशिक -५९.८५ टक्के
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के
पालघर- ५९.३१ टक्के
परभणी- ६२.७३ टक्के
पुणे - ५४.०९ टक्के
रायगड - ६१.०१ टक्के
रत्नागिरी- ६०.३५ टक्के
सांगली - ६३.२८ टक्के
सातारा - ६४.१६ टक्के
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के
सोलापूर -५७.०९ टक्के
ठाणे - ४९.७६ टक्के,
वर्धा - ६३.५० टक्के
वाशिम -५७.४२ टक्के
यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
-
पुणे जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 54.09 टक्के मतदान
मतदारसंघनिहाय टक्केवारी ( 5 वाजे पर्यंत )
पर्वती 48.65 टक्के
हडपसर 45.02 टक्के
पुणे कॅन्टोन्मेंट 47.83 टक्के
कसबा पेठ 54.91 टक्के
वडगाव शेरी 50.46 टक्के
शिवाजीनगर 44.95 टक्के
कोथरूड 47.42 टक्के
खडकवासला 51.56 टक्के
-
Maharashtra Assembly Election 2024 : नगर जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 61.95 टक्के मतदान
मतदारसंघनिहाय टक्केवारी ( 5 वाजे पर्यंत )
अहमदनगर शहर: 56.43 टक्के
अकोले: 66.16 टक्के
कर्जत- जामखेड: 66.5 टक्के
कोपरगाव: 65.08 टक्के
नेवासा: 70.49 टक्के
पारनेर: 61.19 टक्के
राहुरी : 61.04 टक्के
संगमनेर: 64.13 टक्के
शेवगाव: 56.05 टक्के
शिर्डी :64.77 टक्के
श्रीगोंदा : 55.48 टक्के
श्रीरामपूर: 58.42 टक्के
-
Maharashtra Assembly Election 2024 : कर्जत- जामखेडमध्ये पुन्हा मोठी रक्कम जप्त
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मोठी रक्कम पकडली गेली आहे. माहितीनुसार, महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचे नातेवाईक असणाऱ्या खांडेकर नावाच्या व्यक्तीकडे सहा ते सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
-
Maharashtra Election 2024 : बीड जिल्ह्यात मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Maharashtra Election 2024 : बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
-
राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती मतदान
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
अहमदनगर : ४७.८५ टक्के
अकोला : ४४.४५ टक्के
अमरावती : ४५.१३ टक्के
औरंगाबाद : ४७.०५ टक्के
बीड : ४६.१५ टक्के
भंडारा : ५१.३२ टक्के
बुलढाणा : ४७.४८ टक्के
चंद्रपूर : ४९.८७ टक्के
धुळे : ४७.६२ टक्के
गडचिरोली : ६२.९९ टक्के
गोंदिया : ५३.८८ टक्के
हिंगोली : ४९.६४टक्के
जळगाव : ४०.६२ टक्के
जालना : ५०.१४ टक्के
कोल्हापूर : ५४.०६ टक्के
लातूर : ४८.३४ टक्के
मुंबई शहर : ३९.३४ टक्के
मुंबई उपनगर : ४०.८९ टक्के
नागपूर : ४४.४५ टक्के
नांदेड : ४२.८७ टक्के
नंदुरबार : ५१.१६ टक्के
नाशिक : ४६.८६ टक्के
उस्मानाबाद : ४५.८१ टक्के
पालघर : ४६.८२ टक्के
परभणी : ४८.८४ टक्के
पुणे : ४१.७० टक्के
रायगड : ४८.१३ टक्के
रत्नागिरी : ५०.०४ टक्के
सांगली : ४८.३९ टक्के
सातारा : ४९.८२ टक्के
सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के
सोलापूर : ४३.४९ टक्के
ठाणे : ३८.९४ टक्के
वर्धा : ४९.६८ टक्के
वाशिम : ४३.६७ टक्के
यवतमाळ : ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
-
Maharashtra Assembly Election 2024 : नगर जिल्ह्यात 3 वाजेपर्यंत 44.17 टक्के मतदार
मतदारसंघनिहाय टक्केवारी ( 3 वाजे पर्यंत )
अहमदनगर शहर: 44.17 टक्के
अकोले: 53.19 टक्के
कर्जत- जामखेड: 51.16 टक्के
कोपरगाव: 52.39 टक्के
नेवासा: 54.74 टक्के
पारनेर: 46.91टक्के
राहुरी : 45.90 टक्के
संगमनेर: 50.60 टक्के
शेवगाव: 42.63 टक्के
शिर्डी :53.87 टक्के
श्रीगोंदा : 40.13 टक्के
श्रीरामपूर: 42.32 टक्के
-
Maharashtra Assembly Election 2024 : गडचिरोलीत मतदानाची वेळ संपली, मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा
Maharashtra Election Voting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ संपली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रंगा असल्याने मतदारांचे मतदान घेतले जात आहे. जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 51 टक्के मतदान झाले होते.
-
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 38.56 टक्के मतदान
मतदारसंघनिहाय टक्केवारी ( 1 वाजे पर्यंत )
शाहूवाडी : 41.30 टक्के
हातकणगंले : 35.15 टक्के
इचलकरंजी : 32.79 टक्के
शिरोळ : 37.03 टक्के
चंदगड : 39.19 टक्के
राधानगरी : 42.82 टक्के
कागल : 41.36 टक्के
कोल्हापूर दक्षिण : 35.15 टक्के
करवीर : 45.29 टक्के
कोल्हापूर उत्तर : 35.53 टक्के
-
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
गडचिरोली : 50.89टक्के
गोंदिया : 40.46 टक्के
हिंगोली : 35.97 टक्के
जळगाव : 27.88 टक्के
अहमदनगर :32.90 टक्के
अकोला :29.87 टक्के
अमरावती : 31.32टक्के
औरंगाबाद : 33.89 टक्के
बीड : 32.58 टक्के
भंडारा : 35.06 टक्के
बुलढाणा : 32.91टक्के
चंद्रपूर : 35.54 टक्के
धुळे : 34.05 टक्के
पुणे : 29.03 टक्के
रायगड : 34.84 टक्के
रत्नागिरी : 38.52 टक्के
सांगली : 33.50 टक्के
सातारा : 34.78 टक्के
सिंधुदुर्ग : 38.34 टक्के
सोलापूर : 29.44 टक्के
ठाणे : 28.35 टक्के
वर्धा : 34.55 टक्के
वाशिम : 29.31 टक्के
यवतमाळ : 34.10 टक्के
जालना : 36.42 टक्के
कोल्हापूर : 38.56 टक्के
लातूर : 33.27 टक्के
मुंबई शहर : 27.73 टक्के
मुंबई उपनगर : 30.43टक्के
नागपूर : 31.65टक्के
नांदेड : 28.15 टक्के
नंदुरबार : 37.40 टक्के
नाशिक : 32.30 टक्के
उस्मानाबाद : 31.75 टक्के
पालघर : 33.40 टक्के
परभणी : 33.12टक्के मतदान झाले आहे.
-
सांगली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान
मतदारसंघनिहाय टक्केवारी ( 1 वाजे पर्यंत )
पलूस - कडेगाव - 31.59 टक्के
खानापूर - 31.59 टक्के
तासगाव कवठेमहांकाळ - 33.51 टक्के
जत - 30.78 टक्के
मिरज - 30.83 टक्के
सांगली - 32.23 टक्के
इस्लामपूर - 39.02 टक्के
शिराळा - 37.82 टक्के
-
Pune Assembly Election 2024: पुणे जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 29.03 टक्के मतदान
मतदारसंघनिहाय टक्केवारी
खडकवासला- 29.05
पर्वती- 27.19
हडपसर - 24.15
कँटनमेंट- 25.40
कसबा- 31.67
पिंपरी- 21.34
चिंचवड- 29.34
भोसरी- 30.41
वडगाव शेरी- 26.68
शिवाजी नगर- 23.46
कोथरूड- 27.60
मावळ- 34.17
-
जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले; मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील घटना
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मतदान सुरू असून मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती ही तरुणाईला प्रेरित करणारी ठरत असून बहुसंख्य वृद्ध मतदार मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत.
-
११३ वर्षे वय असलेल्या श्रीमती कांचनबेन नंदकिशोर बादशाह आणि वय वर्षे १०३ असलेले श्री. जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले.
नेपियन सी मार्ग येथील रहिवासी व ११३ वर्षे वय असलेल्या श्रीमती कांचनबेन नंदकिशोर बादशाह तसेच ग्रँट रोड येथील रहिवासी असणारे आणि वय वर्षे १०३ असलेले श्री. जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना शतायुषी मतदारांचा उत्साह तरुणांनाही मागे टाकेल, असा ठरतो आहे.
-
शरद पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
शरद पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेतदिले. मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे शरद पवार यांनी सांगितले. लोकांना बदल अपेक्षित आहे,
-
पर्वती मतदासंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
बिबवेवाडी येथील सर सेनापती हैबतराव शिळीमकर इंग्लिश मीडियम शाळेतील मतदान केंद्रावर पर्वती मतदासंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.लोकशाहीचा उत्सव साजरा करूया, चला मतदान करूया ! पुण्याच्या आणि राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणही मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे आणि आपले अमुल्य मत देऊन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन मिसाळ यांनी केले.
-
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते अकरा या चार तासात झालेले मतदान
पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघा पैकी हडपसर मतदार संघात पहिल्या चार तासात सर्वात कमी मतदार झाले आहे. सकाळी सात ते अकरा या चार तासांमध्ये हडपसर मध्ये ११.४७ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत या मतदारसंघात ४.४५ टक्के मतदार झाले होते.पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते अकरा या चार तासात झालेले मतदान
वडगाव शेरी १५.४८%
शिवाजीनगर १३.२१%
पुणे कॅन्टोन्मेंट १४.१२%
पर्वती १५.९१%
कोथरूड १६.०५%
खडकवासला १७.०५%
कसबा १८.३३%
हडपसर ११.४७%
-
समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा
समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा
-
उरण मध्ये अनेक ठिकाणी धीम्या गतीने मतदान; मतदान करण्यासाठी दोन दोन तासांची प्रतीक्षा
उरण : विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजे पर्यंत २९.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एका मतदान केंद्रात एक मशीन असल्याने जेष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्य दिले जात असल्याने अनेक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून मतदारांना मतदानासाठी दोन दोन तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. उरणच्या ग्रामीण भागातील मतदार घरा बाहेर पडले आहेत. यात महिला आणि तरुणांची संख्या अधिक आहे.
-
९३ वर्षांच्या कमलताई देशमुख यांनी मतदान केले
९३ वर्षांच्या कमलताई देशमुख यांनी कोथरूडमधील बाल शिक्षण मंदिर प्रशाला या शाळेतील मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर जाऊन मतदान केले.
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे मतदान
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी महापालिका शाळा क्र. सहा ओव्हरसिएर कॉलनी येथे मतदान केले.
-
काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला; विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल
‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले. आज मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला.
-
मतदार माहिती चिठ्ठी नसल्याने अनुक्रमांक घोळ
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. अनेक मतदार मतदान करण्यासाठी सकाळी ७ वाजता मतदान केंद्रांवर पोहोचले. मात्र मतदान केंद्रावर गेल्यावर अनुक्रमांक शोधण्यासाठी मतदारांचा बराच वेळ जात होता.
-
समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा
पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोंढावा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अझहर तांबोळी आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनुसया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
-
कोथरूडमध्ये पहिल्या दोन तासात मतदानासाठी उत्साह
भारतीय जनता पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधनसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात ६.५० टक्के मतदान झाले.
-
कसब्यात शांततेत मतदान; दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदारांनी बजावले कर्तव्य
पुणे : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेमध्ये सुरू झाले. उत्साही मतदारांनी सकाळी उन वाढण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले. पहिल्या दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदान झाले.नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशालेत ३१ क्रमांकाचे मशीन काहीवेळ बंद होते. मॉक पोलिंग नंतर अड्रेस टॅग व्यवस्थित न बांधले गेल्याचे आढळून आले.