महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही विधानसभेचं बिगुल वाजलं, दोन टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या वेळापत्रक

  • Written By: Published:
महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही विधानसभेचं बिगुल वाजलं, दोन टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या वेळापत्रक

Jharkhand Election Date : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची (Jharkhand Election) घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर (Maharashtra Election Date) रोजी एकाच टप्पात निवडणुका होणार आहे तर झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये दिली.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 13 आणि 20 नोव्हेंबर 2024 रोजी झारखंड विधानसभानिवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर मतमोजणी महाराष्ट्रासोबतच 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. झारखंड विधानसभेसाठी यावेळी 2 कोटी 60 लाख मतदार मतदान करणार आहे. त्यामध्ये 1 कोटी 29 लाख महिला मतदार असून 1 कोटी 31 लाख पुरुष मतदार आहे. विधानसभेसाठी झारखंडमध्ये 29 हजार 562 बूथवर मतदान होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक

पहिला टप्पा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – 18 ऑक्टोबर

नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख – 25ऑक्टोबर

नामनिर्देशनपत्रे मागे घेणे – 30 ऑक्टोबर

मतदान – 13 नोव्हेंबर

निकाल – 23 नोव्हेंबर

दुसरा टप्पा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – 22 ऑक्टोबर

नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर

नामनिर्देशनपत्रे मागे घेणे – 4 नोव्हेंबर

मतदान – 20 नोव्हेंबर

निकाल – 23 नोव्हेंबर

ऑनलाइन फसवणूक विरोधात होणार जनजागृती, आयुष्मान खुराना Meta सोबत राबवणार विशेष मोहीम

follow us
  • fb
  • instagram
  • youtube