ऑनलाइन फसवणूक विरोधात होणार जनजागृती, आयुष्मान खुराना Meta सोबत राबवणार विशेष मोहीम

  • Written By: Published:
ऑनलाइन फसवणूक विरोधात होणार जनजागृती, आयुष्मान खुराना Meta सोबत राबवणार विशेष मोहीम

Ayushmann Khurrana : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. ज्यामुळे अनेकजण आता ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे देशात सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे. दररोज देशात होत असलेल्या ऑनलाईन फसवणूक थांबण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे.

तर दुसरीकडे मेटा (Meta) देखील आता लोकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन मोहीम घेऊन आला आहे. मेटाने नुकतंच आपली नवीन सुरक्षा मोहीम  ‘स्कैम्स से बचो’ (Scams Se Bacho) लाँच केली आहे आणि या मोहिमेसाठी बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार आयुष्मान खुरानासोबत (Ayushmann Khurrana) भागीदारी केली आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि डिजिटल सुरक्षा पद्धतींचे पालन करण्याचे शिक्षण देणे आहे.

मेठाने ही मोहीम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्र (I4C) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) यांच्या सहकार्याने सुरू केली आहे. मेटा या मोहिमेअंतर्गत देशातील वाढत्या फसवणूक आणि सायबर फसवणूकच्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला पाठिंबा देत आहे.

या मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या सर्वसामान्य फसवणुकींबाबत सतर्क राहण्याचे आणि कोणतेही पाऊल उचलण्याआधी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येणार आहे तसेच रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप वरील सुरक्षा फीचर्स दाखवण्यात आली आहे. जी यूजर्सना त्यांच्या ऑनलाइन सुरक्षेवर नियंत्रण ठेवण्याची संधी देणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meta India (@metaindia)

या व्हिडिओमध्ये आयुष्मान खुराना एक दक्ष विवाहसोहळ्यातील पाहुणा म्हणून दिसतोय, जे फसवणुकीच्या बळी पडत असलेल्या लोकांना विचारणा करत आहे. मेटाने सुरक्षा फीचर्समध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, ब्लॉक आणि रिपोर्ट, तसेच व्हाट्सअपची ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्ज हायलाइट केल्या आहेत. ही मोहीम मेटाच्या प्रोडक्ट फीचर्समुळे आणि सेफ्टी टूलमुळे लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून आणि खात्याचे नुकसान होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक संरक्षण कसे उपलब्ध होणार याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

या मोहिमेबाबत माहिती देताना आयुष्मान खुराना म्हणाला की,  आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन फसवणूकच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आपल्याला सतर्क राहणे आणि सुरक्षित राहण्याचे मार्ग शिकणे खूप महत्वाचे आहे. मेटाच्या या सुरक्षाविषयक उपक्रमाचा भाग बनून मला आनंद होत आहे, ज्याचा उद्देश लोकांना संभाव्य सायबर फसवणुकीपासून कसे संरक्षण करावे याबद्दल जनजागृती करणे आहे.

VIDEO : निवडणूक आयुक्तांचं EVM बाबत मोठं विधान म्हणाले, “ईव्हीएमध्ये कोणतीही..”

डिजिटल युगात काही करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा आणि मेटाच्या सेफ्टी टूलचा वापर करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑनलाइन सुरक्षेवर नियंत्रण मिळवता येईल. असं  आयुष्मान खुराना म्हणाला. OTP फसवणूक, बँक अकाऊंट आणि गोपनीय माहिती  घेणारी फसवणूक, खोट्या ओळखीतून लोकांना पैसे देण्यास प्रवृत्त करणारी फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणूक फसवणूक, आणि बनावट लोन अॅप्स आणि ऑफर यासारख्या विविध फसवणुकीचे या मोहिमेत प्रदर्शन करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube