फिटनेसचा उत्सव साजरा करा! क्रीडा दिनी सेलिब्रिटींचं एकत्रित आवाहन

National Sports Day : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), शर्वरी, पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu), मीराबाई चानू आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) भारतीयांना खेळ अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त (Sport) राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदा या निमित्ताने बॉलिवूडचे तारे आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्र येत देशवासीयांना खेळांना जीवनाचा (Entertainment News) अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले.
75 व्या वर्षी रिटायरमेंट नाही! मोहन भागवत यांचे मोठे विधान, ‘स्वयंसेवक आयुष्यभर कार्यरत…’
या उपक्रमात आयुष्मान खुराना, शर्वरी, ऑलिंपिक विजेती पी. व्ही. सिंधू, वेटलिफ्टिंग स्टार मीराबाई चानू आणि शूटिंग लिजेंड अभिनव बिंद्रा यांनी सामर्थ्यशाली व्हिडिओ संदेशातून लोकांना खेळात सहभागी होण्याची प्रेरणा दिली.
View this post on Instagram
या मोहिमेला अधिक गती देत फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना आणि यंग फिट इंडिया आयकॉन शर्वरी यांनी देखील क्रीडा मंत्री डॉ. मांडविया यांचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर करत लोकांना क्रीडाप्रधान जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
PHOTO : आझाद मैदानावर तुफान गर्दी, लाखो मराठी आंदोलकांची उपस्थिती
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संदेशाने स्पष्ट केले की क्रीडा हे केवळ स्पर्धा नसतात. ते शिस्त, चिकाटी आणि सामूहिकतेची भावना घडवतात. या सर्वांचे एकत्रित आवाहन सोपे पण प्रभावी आहे. खेळ अंगीकारा, फिटनेसचा उत्सव साजरा करा आणि तो आयुष्यभराची सवय बनवा.