Ayushmann Khurrana : ‘फ्युचर लीडर फॉर वन एशिया’ पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय, 22व्या गालात चमकदार कामगिरी
![Ayushmann Khurrana : ‘फ्युचर लीडर फॉर वन एशिया’ पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय, 22व्या गालात चमकदार कामगिरी Ayushmann Khurrana : ‘फ्युचर लीडर फॉर वन एशिया’ पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय, 22व्या गालात चमकदार कामगिरी](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2024/12/Ayushmann-Khurrana-2_V_jpg--1280x720-4g.webp)
Ayushmann Khurrana win Future Leader for One Asia award : बॉलिवूड सुपरस्टार आणि तरुणाईचे प्रेरणास्थान आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांनी 22व्या अनफॉरगेटेबल गाला मध्ये ‘फ्युचर लीडर फॉर वन एशिया’ पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. कॅरॅक्टर मीडिया आणि गोल्डन टीव्ही यांनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात आयुष्मान यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात (Ayushmann Khurrana Movie) आला. विशेष म्हणजे, या वर्षी हा पुरस्कार मिळवणारे आयुष्मान खुराना हे पहिले भारतीय आहेत.
अनफॉरगेटेबल गाला हा आशियाई आणि पॅसिफिक आयलँड सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्ती आणि कला, मनोरंजन व संस्कृतीत योगदान देणाऱ्या नेत्यांचा सन्मान करणारा कार्यक्रम (Bollywood News) आहे. दरवर्षी 500 हून अधिक एशियन आणि पॅसिफिक आयलँडर (API) क्षेत्रातील व्यावसायिक आणि नामांकित व्यक्तिमत्वे बेवर्ली हिल्टन येथे या खास सोहळ्यासाठी एकत्र येतात.
“भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता, हिंमत असेल तर..”, राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज!
आयुष्मान यांच्यासोबत काही प्रमुख विजेते देखील होते. जोआन चेन, ज्यांनी चिनी-अमेरिकन अभिनेत्री म्हणून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हिरोयुकी सनाडा, ज्यांना “शोगुन” आणि “जॉन विक” फ्रँचाईझसाठी ओळखले जाते. आयुष्मान यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपले विचार व्यक्त करताना म्हटलं की, “भारत, त्याच्या कथा, संस्कृती आणि लोक यांचा गौरव करणे, मला एक रचनात्मक कलाकार म्हणून नेहमी प्रेरणा देते. भारताचे एक वेगळे रूप जगासमोर आणणे, सांगितल्या न गेलेल्या कथा सांगणे, आणि दुर्लक्षित मुद्द्यांना पुढे आणणे, हे मला महत्त्वाचे वाटते.
‘विकी डोनर’, ‘दम लगाके हईशा’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘आर्टिकल 15’, ‘बधाई हो’, ‘चंदीगड करे आशिकी’, ‘बाला’ या सारख्या सिनेमांमधून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा प्रयत्न होता. मला आनंद आहे की, या कथा जगभर आवडल्या गेल्या.
अमेरिका, युरोप, नाटो अन् एक टीव्ही शो.. युक्रेन-रशिया युद्धाचं नेमकं कारण तरी काय?
आयुष्मान पुढे म्हणाला की, दक्षिण आशियाई कलाकार आणि त्यांच्या कामांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणाऱ्या कॅरॅक्टर मीडिया आणि एशिया लॅब्स या व्यासपीठाचे मी मनापासून आभार मानतो. कला आणि सिनेमा यांना आता भाषेच्या किंवा देशाच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. सिनेमा आपल्या सर्वांना एकत्र आणण्याची ताकद बाळगतो. हा पुरस्कार त्या सर्व भारतीय आणि दक्षिण आशियाई कथाकारांसाठी आहे, जे प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता करतात. चला, जगाला दाखवूया की भारत किती सुंदर आहे.
आयुष्मानचा प्रवास आणि सामाजिक योगदान :
अद्वितीय भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले आयुष्मान खुराना यांनी बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. अभिनय आणि गाण्याव्यतिरिक्त, युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत म्हणून भारतातील मुलांसाठी त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचे ब्रँड असोसिएशन्स हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
अन्य २०२४ अनफॉरगेटेबल गाला विजेते:
जोआन चेन (“दीदी” चित्रपटातील चुंगसिंग वांग) – चित्रपटातील उत्कृष्ट अभिनेता
अन्ना सवाई (“शोगुन” मधील लेडी टोडा मारिको) – टीव्हीतील उत्कृष्ट अभिनेता
इझाक वांग (“दीदी” मधील क्रिस वांग) – चित्रपटातील ब्रेकआउट परफॉर्मर
होआ झुआंडे (“द सिम्पथायझर” मधील द कॅप्टन) – टीव्हीतील ब्रेकआउट परफॉर्मर
शॉन वांग (“दीदी”) – दिग्दर्शक
रॅचल कोंडो (“शोगुन”) – लेखक
विवियन तू (“योर रिच BFF”) – डिजिटल इन्फ्लुएंसर
“अवतार: द लास्ट एअरबेंडर” (नेटफ्लिक्स लाईव्ह अॅक्शन अडॉप्टेशन) – व्हॅनगार्ड पुरस्कार