Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना ‘या’ दिग्दर्शिकासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला….
Ayushmann Khurrana: पायल कपाडिया (Payal Kapadia) यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ (All We Imagine as Light ) या चित्रपटाने यावर्षी इतिहास रचला, जेव्हा हा भारताचा पहिला चित्रपट ठरला. ज्याला कान्सचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. देशभर आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या विजयाचा उत्साहाने आनंद (Ayushmann Khurrana) साजरा केला. या जागतिक मान्यतेच्या निमित्ताने, पायल टाइम मासिकाच्या टाइम 100 नेक्स्ट 24 या यादीत समाविष्ट झाल्या, जी आजच्या काळातील सर्वात प्रभावशाली नेत्यांचा सन्मान करते. त्यांचा चित्रपट ऑल वी इमॅजिन अॅज लाइटसाठी सन्मान करत आयुष्मान खुरानाने पायलच्या कार्याला भावनिक ट्रिब्यूट म्हणून सुंदर शब्दात नोट लिहली आणि त्यांना ‘एक खरी पथदर्शक’ म्हटलं आहे.
View this post on Instagram
‘टाइम100’, ‘नेक्स्ट 24 ‘चा भाग म्हणून पायल कपाडिया आणि त्यांच्या चित्रपटाबद्दल बोलताना, आयुष्मान खुराना म्हणाला, “पायल कपाडिया या नक्कीच एक पथदर्शक आहेत. त्यांचा 2024 चा चित्रपट ऑल वी इमॅजिन अॅज लाइट या वर्षी इतिहास रचला, जेव्हा हा चित्रपट कान्सचा ग्रँड प्रिक्स जिंकणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट भावना प्रकट करण्याचा मास्टर क्लास आहे.
पायल यांच्या दिग्दर्शनाविषयी बोलताना, आयुष्मान म्हणाला, “मानवी अनुभवांना पडद्यावर मांडण्याची त्यांची शैली विलक्षण प्रभावी आहे. त्यांचा खरा दृष्टिकोन आणि वास्तवाच्या प्रतिमांना दाखवण्याचा दृष्टीकोन त्यांच्या कामाला अत्यंत दुर्मीळ बनवतो. कान्समधील त्यांच्या यशाचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्याच्या महत्त्वाचा उल्लेख करताना आयुष्मान म्हणाले, “कान्समधील त्यांचा हा विजय भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड आहे. मी अशा युगात जगण्याचा अभिमान बाळगतो.
मला पायलसारख्या कलाकारांना पाहण्याची संधी मिळते, ज्यांनी जगाला दाखवून दिलं आहे की भारतीय कथा सार्वत्रिक पातळीवर गूंजतात, भौगोलिक आणि भाषिक सीमा ओलांडून. त्यांचा विजय इतर चित्रपट निर्माते आणि कलाकारांना त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून मोठं स्वप्न पाहायला प्रेरित करेल. भारत एक तरुण देश आहे, 1.4 अब्ज लोकांचा. आमच्याकडे 1.4 अब्ज कहाण्या आहेत आणि पायलने धाडसाने, ठामपणे आणि उत्कृष्टतेने सर्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. त्यांच्या सोबत काम करण्याची आणि त्यांच्या विचारसरणीचा भाग होण्याचं सन्मान असेल.”
ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करा; Ayushmann Khurrana ने केलं आवाहन
आयुष्मानने दिलेला हा ट्रिब्यूट केवळ पायलच्या मोठ्या यशाला मान्यता देत नाही, तर त्यांच्या कथेचा जागतिक पातळीवर पुढील पिढीच्या चित्रपट निर्मात्यांवर कसा प्रभाव पडतो हे देखील अधोरेखित करते. आता आयुष्मानने पायलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, आम्ही उत्सुक आहोत की हे दोन कलाकार एकत्र कोणतं उत्कृष्ट काम करतात.