आयुष्मान खुराना देणार मुंबई पोलिसांना साथ! सायबर गुन्ह्यांविरोधात करणार जनजागृती

Ayushmann Khurrana will create awareness against cyber crimes with Mumbai Police : भारतामध्ये सर्वाधिक विश्वासार्ह आणि विश्वसनीय कलाकार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता व गायक आयुष्मान खुराना आता मुंबई पोलिसांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृती उपक्रमाचा चेहरा बनला आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे सायबर गुन्ह्यांबद्दल वाढती जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांना – विशेषतः संवेदनशील गटांना – सायबर फसवणुकीच्या क्लृप्त्यांविषयी माहिती देणे.
Tahawwur Hussain Rana : पाकिस्तानात जन्मला, कॅनडात वसला; डॉक्टर दहशतवादी कसा बनला?
या मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचार व्हिडीओमध्ये आयुष्मान ऑनलाइन सतर्क राहण्याचे आणि सायबर फसवणुकीपासून बचावाचे काही उपयुक्त उपाय शेअर करतो. बहुतेक वेळा सामान्य नागरिकच सायबर गुन्ह्यांचे बळी ठरतात, कारण त्यांना या गुन्हेगारांच्या आधुनिक पद्धतींची पुरेशी माहिती नसते.मुंबई पोलिस आणि आयुष्मान खुराना यांचे हे संयुक्त प्रयत्न नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सशक्त बनवण्याचा संदेश देतात.
तहव्वुर राणाच्या टार्गेटवर होता ‘कुंभमेळा’; एनआयएच्या माजी महानिरीक्षकांचा धक्कादायक खुलासा
सायबर सुरक्षेबाबत आयुष्मान म्हणाला:“आजच्या काळात सायबर सुरक्षेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑनलाइन फसवणूक व स्कॅम्सचा धुमाकूळ पाहता, प्रत्येकाने सतर्क व जागरूक राहणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांसोबत मिळून काम करणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. त्यांनी नेहमीच मुंबईकरांचं रक्षण केलं आहे आणि आता सायबर सुरक्षेच्या दिशेनेही महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. मुंबई पोलिसांनी सुरू केलेली हेल्पलाईन आणि जनजागृती मोहिम लोकांना सजग बनवण्यासाठी एक मोठं पाऊल आहे.”